agriculture news in marathi, Support for drought-affected areas for survival of orchards | Agrowon

दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा जगवण्यासाठी दिले टॅंकर
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र दुष्काळी स्थिती पाहता, दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यामध्ये स्थानिकांसह दिल्ली येथील व्यावसायिकांनी निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील पन्नास शेतकऱ्यांना फळबागांना टॅंकरचे दिले, तसेच आर्थिक मदत केली. दिलेल्या आर्थिक मदतीतून फळबागांना टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र दुष्काळी स्थिती पाहता, दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यामध्ये स्थानिकांसह दिल्ली येथील व्यावसायिकांनी निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील पन्नास शेतकऱ्यांना फळबागांना टॅंकरचे दिले, तसेच आर्थिक मदत केली. दिलेल्या आर्थिक मदतीतून फळबागांना टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

तालुक्‍यातील निवडुंगे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद मरकड दिल्ली येथे शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये त्यांनी कायम दुष्काळी भाग असलेल्या पाथर्डी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या व्यथा ऐकून दिल्लीस्थित काही व्यावसायिक दुष्काळी भागाला मदत करण्यासाठी पुढे आले. काहींनी रोख स्वरूपात मदतही दिली. स्वतः मरकड यांनी त्यासाठी हात पुढे केले. सुमारे एक लाख रुपयांची मदत जमा झाली. त्यामध्ये स्वतःचे काही पैसे घालून शेतकरी संघटनेचे मरकड यांनी अनेक फळबागांना पाणी टॅंकरद्वारे मोफत देण्याचे ठरविले. शेतकऱ्यांना फळबागांकरिता पाण्याच्या टॅंकरसाठी २५०० ते ३००० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना जगण्याचा आधार म्हणून फळबागांकडे पाहिले जाते. 

कर्जबाजारी शेतकऱ्यांना पाणी विकत घेऊन फळबागा जगविणे कठीण झाल्याने त्यामुळे निवडुंगे परिसरात सुमारे पन्नास शेतकऱ्यांच्या फळबागांना टॅंकरने पाणी मोफत देण्यात आले. तालुका दुष्काळाने होरपळत असताना सरकार उपाययोजना करील तेव्हा करील; पण आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात आहोत. फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद मरकड यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...