औरंगाबाद : खातखेडा-साखरवेलच्या सरपंचपदी निवडून आलेलेे देवमन घुगे व इतर कार्यकर्ते जल्लोष करताना.
औरंगाबाद : खातखेडा-साखरवेलच्या सरपंचपदी निवडून आलेलेे देवमन घुगे व इतर कार्यकर्ते जल्लोष करताना.

ग्रामपंचायत निवडणुकीत नेत्यांच्या समर्थकांना धक्के

लातूर  : लातूर जिल्ह्यातील ३३३ गावांतील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी (ता. ९) जाहीर झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नेत्यांच्या समर्थकांच्या पॅनेलला ग्रामस्थांनी धक्के दिले आहेत. या निवडणुकीत काही माजी आमदारांच्या समर्थकांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.

लातूर तालुक्यात मुरुड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे यांना ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. त्यानंतर गंगापूर ही मोठी ग्रामपंचायत आहे. येथे आमदार अमित देशमुख यांच्या समर्थकांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत होती. पण भाजपचे बाबू खंदाडे यांचे पॅनल विजयी झाले असून ३५ वर्षांनंतर येथे परिवर्तन घडले आहे.

विकास कारखान्याचे संचालक उमेश बेद्रे (भातखेडा), बालाजी साळुंके (खाडगाव) व नितीन पाटील (पेठ) यांच्या पॅनलला मतदारांनी नाकारले आहे. रेणापूर तालुक्यात आमदार अॅड. त्र्यंबक भिसे यांना आपली भोकरंबा ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या कामखेडा ग्रामपंचायतमध्ये पाटील समर्थकांच्या पॅनेलाच धुव्वा उडाला आहे. याच कारखान्याचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे यांच्या समर्थकांच्या पॅनललाही पोहरेगावमध्ये भाजपच्या पॅनेलने धूळ चारली आहे.

अहमदपूर तालुक्यात माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद गावात त्यांचा सरपंच झाला, पण पॅनेलचा मात्र पराभव झाला आहे. तर भाजपचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या सताळा या गावात त्यांचा सरपंच पदाचा उमेदवाराचा पराभव झाला, पण पॅनेल मात्र आले. सोनखेड, मानखेड पाटोदा ग्रुप ग्रामपंचायत भाजपचे नेते शिवाजीराव भिकाणे यांचा मुलगा सचिन भिकाणे यांचा सरपंच पदाला पराभव झाला. येथे रिपाइंचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे यांचे पॅनेल निवडूण आले. 

निलंगा तालुक्यात पानचिंचोली या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांचे बंधू श्रीकांत साळुंके हे सरपंच झाले असून ग्रामपंचायतही ताब्यात आली आहे. मदनसुरी येथे शिवसेनेचे शिवाजी माने यांना ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. निटूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमेश्वर हासबे हे अपक्ष म्हणून सरपंच झाले आहेत.

शेडोळ येथे भाजपच्या हातून सत्ता ताब्यात घेण्यात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीत धुमाळ यांना यश आले आहे. काही ठिकाणी धक्के बसले असले तरी बहुतांश ग्रामपंचायती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थकांच्या ताब्यात गेल्या आहेत. औसा तालुक्यात आशिव येथे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने व काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांच्या समर्थकांनी संयुक्त पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com