agriculture news in marathi, supreme court notice to government in pesticide ban, Maharashtra | Agrowon

कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात वापरात असलेल्या सुमारे ८५ कीडनाशकांवर बंदी घालण्याच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा व विनीत सरण यांच्या खंडपीठाने याबाबत केंद्र सरकार व संबंधित विभागांकडे याअनुषंगाने विचारणा केली आहे. त्याचबरोबर कीडनाशकांवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारचे अधिकार अधिक सक्षम करण्यात यावेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात वापरात असलेल्या सुमारे ८५ कीडनाशकांवर बंदी घालण्याच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा व विनीत सरण यांच्या खंडपीठाने याबाबत केंद्र सरकार व संबंधित विभागांकडे याअनुषंगाने विचारणा केली आहे. त्याचबरोबर कीडनाशकांवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकारचे अधिकार अधिक सक्षम करण्यात यावेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

पर्यावरण विषयाच्या अभ्यासक कविता कुरूगंटी यांनी न्यायालयात कीडनाशकांवर बंदी घालण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकत्यांतर्फे प्रशांत भूषण यांनी त्याबाबत आपले म्हणणे मांडले. अन्य देशांत बंदी असलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर भारतात आजही होत आहे. हा वापर असाच होत राहिला, तर भारतीय शेतकऱ्याचे आणि मजुरांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात येऊ शकते, असे म्हणणे भूषण यांनी याचिकाकत्यांतर्फे मांडले. या कीटकनाशकांचे दीर्घकाळानंतर प्रतिकूल परिणाम होऊ शकतातच. मात्र फवारणीदरम्यान त्वरित विषबाधा होण्याचा धोकाही मोठा आहे. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. त्यावर वेळीच नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे. 

कविता कुरूगंटी यांनी सादर केलेल्या याचिकेत त्यात त्यांनी म्हटले आहे, की सध्याच्या काळात पर्यावरणपूरक किंवा सेंद्रिय शेतीला यश मिळताना दिसू लागले आहे. त्यातून शेतीची उत्पादकता वाढण्यासोबत शेतकऱ्यांनाही फायदा होत असल्याचे सिद्ध होत आहे. असे असतानाही रासायनिक कीडनाशकांचा वापर देशात सुरू आहे ही विसगंती म्हणावयास हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकार कीडनाशकांवर बंदी घालण्यास पुरेशी सक्षम आहेत. मात्र त्यांना तसे अधिकारच नाहीत ही बाब घटनेतील कलमाच्या विरुद्ध असल्याचे कुरूगंटी यांनी म्हटले आहे.  
कीडनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू होण्याचे व इस्पितळात दाखल होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात असे ४० रुग्ण आज उपचार घेत आहेत. तर अकोला येथे बळींच्या संख्येसह उपचार घेत असलेल्यांची संख्या ४० पर्यंत आहे. हा आकडाच कीडनाशकांच्या विषारीपणाचा पुरावा असल्याचे याचिकाकर्त्या कुरूगंटी यांनी म्हटले आहे.

 

 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...