agriculture news in Marathi, supriya sule said NCP will support for total laon waiver scheme | Agrowon

संपुर्ण कर्जमाफीला राष्ट्रवादीचा पाठींबा ः सुप्रिया सुळे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

वरवंड, जि. पुणे ः कर्ज भरण्याची शेतकऱ्याची मानसिकता आहे. केवळ सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेतकऱ्यांना संप करावे लागणे म्हणजेच हा काळा दिवस म्हणावा लागेल. संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

वरवंड, जि. पुणे ः कर्ज भरण्याची शेतकऱ्याची मानसिकता आहे. केवळ सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेतकऱ्यांना संप करावे लागणे म्हणजेच हा काळा दिवस म्हणावा लागेल. संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामस्थांनी २ नोव्हेंबरपासून बेमुदत शेतकरी आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी (ता. ३) आंदोलनाचा दुसरा दिवस होता. दौंड तालुक्यातील अनेक गावांनी आंदोलनास पाठिंबा देण्यास सुरवात केल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे.

शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील आक्रोश आंदोलनास भेट दिली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके, लक्ष्मण सातपुते, सभापती मीना धायगुडे, नितीन दोरगे आदी उपस्थित होते. या वेळी सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना दिले.

या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, की सरकाचे अच्छे दिन फक्त भाजपच्या नेत्यांनाच आले आहेत. या सरकारच्या काळात एसटी, अंगणवाडी सेविका, शेतकरी आदी आंदोलने उफाळून आली. सरकारच्या सगळ्या योजना फोल ठरल्या आहेत. सरकारला शेतकरी सोडून सगळे दिसतात. तत्कालीन केद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेबांनी सर्वांत मोठी कर्जमाफी दिली. या सरकारने कर्जमाफीचे गाजर दाखविले. प्रत्यक्षात किती जणांना कर्जमाफी मिळाली हा विचार करण्याचा विषय आहे.

इतर बातम्या
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
परभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...
करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्‍यातील लघू...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...
शेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...