agriculture news in Marathi, Suresh mane-patil says Farmers should create seed nurseries, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनी बियाणाचे मळे करावे ः सुरेश माने-पाटील
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

सांगली ः उसाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः बियाणाचे मळे तयार केले पाहिजे. ऊस ९ ते १० महिन्यांचा असावा. बियाणांसाठी जाड ऊस, लांब कांड्या साखर कमी असलेला ऊस आपल्या शेतातून निवडला पाहिजे. सरीतील अंतर वाढवा आणि उसाचे उत्पादन वाढवा हे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे मत माजी शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सुरेश माने-पाटील यांनी व्यक्त केले.

सांगली ः उसाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः बियाणाचे मळे तयार केले पाहिजे. ऊस ९ ते १० महिन्यांचा असावा. बियाणांसाठी जाड ऊस, लांब कांड्या साखर कमी असलेला ऊस आपल्या शेतातून निवडला पाहिजे. सरीतील अंतर वाढवा आणि उसाचे उत्पादन वाढवा हे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे मत माजी शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सुरेश माने-पाटील यांनी व्यक्त केले.

सांगली येथे सुरू असलेल्या ‘ॲग्रोवन’ प्रदर्शनात ऊस पिकाचे भरघोस उत्पादन व व्यवस्थापन या विषयावर शनिवारी (ता. ६) ते बोलत होते. या वेळी सांगलीसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुरेश माने-पाटील म्हणाले, की देशातील ऊस एकरी उत्पादकता २७ टन आहे. उत्पादकता वाढविली पाहिजे. यासाठी ऊस पिकाचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा. सांगली जिल्ह्यातील क्रांती कारखाना, हुतात्मा कारखाना, राजारामबापू कारखान्यांची उत्पादकता ही ४० ते ४३ टनापर्यंत आहे. सांगली जिल्ह्यात अनेक शेतकरी उसाचे विक्रमी उत्पादन घेतात. ही चांगली बाब आहे. अशा शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या यशाचे गमक माहिती करून घेतली पाहिजे. 

आपल्याकडे आडसाली, पूर्व हंगाम, सुरू हंगाम हे उसाच्या लागवडी हंगाम आहेत. आडसाली हंगाम म्हणजे अधिक उत्पादन देणारा हंगाम आहे. या हंगामात आंतर पीक घेऊ नये. यामुळे उत्पादनात घट होते. पूर्व हंगामामध्ये आंतरपिक घेतले चालते. म्हणजे हा हंगाम ऊस आणि आंतरपिक म्हणून ओळखला जातो. यामध्ये आंतरपिकांतून अधिक फायदा होतो. सुरू हंगामात उसाचे ४० ते ६० टन उत्पादन मिळते. हा हंगाम १३ ते १४ महिन्यांत गाळपाला जातो. त्यामुळे अधिक उत्पादन घेण्यासाठी आडसाली लागवड केली पाहिजे.  

व्याख्यानातील ठळक मुद्दे

  • उसाची शेती करण्यासाठी यांत्रिकीकरण अवश्‍य
  • सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेणखत, हिरवळीची खते, पाचट व्यवस्थापन करावे
  • एकरी १०० टन उत्पादन घेण्यासाठी सरीतील अंतर वाढविणे गरजेचे
  • पाट पाणीपद्धतीने ऊस शेती करताना शेतीचे सपाटीकरण करावे
  • उसाची संख्या वाढण्यासाठी बाळ भरणी करावी
  • खोडव्यात पाचट व्यवस्थापन, बुडके तासणे, तुटाळी सांधणे आणि खत व्यवस्थापन ही पंचसूत्री कामे आवश्‍यक
     

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...