agriculture news in marathi, Surgical strikes on farmers' issue : Sinha | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्जिकल स्ट्राइक करणार : सिन्हा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 डिसेंबर 2017

अकोला : या देशातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा, संपूर्ण शेतमाल खरेदी केला जावा, अशा साध्या मागण्या हे सरकार मंजूर करीत नाही, त्यामुळे जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस आश्वासन देत नाही, तोवर अकोला सोडणार नाही. देशाच्या सैनिकांनी जसे सर्जिकल स्ट्राइक केले, तसेच आंदोलन सोमवारी (ता. 4) शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी छेडणार आहे, असा इशारा देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला. येथील स्वराज्य भवनाच्या मैदानावर झालेल्या कापूस-सोयाबीन-धान परिषदेत ते बोलत होते.

अकोला : या देशातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा, संपूर्ण शेतमाल खरेदी केला जावा, अशा साध्या मागण्या हे सरकार मंजूर करीत नाही, त्यामुळे जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस आश्वासन देत नाही, तोवर अकोला सोडणार नाही. देशाच्या सैनिकांनी जसे सर्जिकल स्ट्राइक केले, तसेच आंदोलन सोमवारी (ता. 4) शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी छेडणार आहे, असा इशारा देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला. येथील स्वराज्य भवनाच्या मैदानावर झालेल्या कापूस-सोयाबीन-धान परिषदेत ते बोलत होते.

यशवंत सिन्हा म्हणाले, गेल्या महिन्यात अकोल्यात आलो त्यावेळी नाफेडने कुठलीही अट न लावता शेतमाल खरेदी करावा, अशी मागणी केली. परंतु 48 दिवस लोटले तरी याबाबत सरकारने काहीही केले नाही. आधीच नोटाबंदीमुळे संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेला हादरे बसले आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांसाठी इन्कम सिक्‍युरिटी स्कीम असणे गरजेचे आहे. परंतु सध्या देशात शेतकऱ्यांचे साधे साधे प्रश्नही सुटत नाहीत. नोटाबंदीनंतर झालेल्या फायद्यांबाबत दिली जाणारी उदाहरणे हास्यास्पद बनल्याचे सांगत शेतकरी वर्षानुवर्षे संकटात आहेत, हे खरे असले तरी सध्याच्या काळात तो ठगविलो असल्याचा अनुभव घेत आहे, असे सांगत सिन्हा यांनी भाजप सरकारवर थेट टीका केली. हे सरकार येऊन साडेतीन वर्षे झाले, परंतु काहीच शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही. दुसरीकडे देशाच्या संसदेच्या अधिवेशनापेक्षा काही राज्यांच्या निवडणुका मोठ्या झाल्याचेही सिन्हा म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस काही तरी हवे आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ठोस काही सरकार देत नाही तोवर आपला लढा सुरू राहील. अकोल्यात सोमवारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सर्जिकल स्ट्राइक करणार आहे, असे सिन्हा म्हणाले. जोपर्यंत मागण्या मान्य करणार नाही तोवर अकोला सोडणार नाही. आपण दिल्लीला जाण्याचे परतीचे तिकीट अद्यापही काढले नाही, असे सिन्हा यांनी सांगितले.

आजच्या आंदोलनाकडे लक्ष
यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी नेते सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात शेतकऱ्यांनी संपूर्ण कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. आंदोलनाची पुढील दिशा वेळेवर जाहीर केली जाईल, असे सांगत त्यांनी सोमवारच्या आंदोलनाबाबत गुपीत कायम ठेवले.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....