agriculture news in marathi, surrogated cow will bitrh in baramati, pune, maharashtra | Agrowon

अमेरिकन गोवंशाचा जन्म होणार बारामतीत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

भारतात उच्च अनुवंशिकतेच्या दुधाळ गायींची जरुरी आहे. मात्र सध्या उच्च भ्रूण आयात होत नाहीत, अशा स्थितीत आयव्हीएफ तंत्राने किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्राने उच्च अनुवंशिकता असलेल्या दुधाळ गाईंची पैदास करता येतील. त्यांच्यामार्फत दुधाळ गोवंशाचा प्रसार होऊ शकेल, त्यासाठी हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.
- राजेंद्र पवार, प्रमुख, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती.

बारामती,जि.पुणे  ः  अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सहा वर्षांपूर्वी अमेरिकेतून आयात केलेल्या उच्च अनुवंशिकतेच्या होल्स्टिन गायीच्या भ्रूणाचे प्रत्यारोपण (एम्ब्रियो ट्रान्सफर) यशस्वी झाले अाहे. शारदानगर येथील या प्रयोगात सध्या सात सरोगेट संकरीत गायी `गर्भवती` आहेत. ही सर्वोत्तम खूशखबर ऐकून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ट्रस्ट, कृषी महाविद्यालय आणि पशुसंवर्धन महाविद्यालयातील पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची कौतुकाने पाठ थोपटली.

गेली सहा वर्षे या प्रयोगाची प्रतीक्षा केली जात होती. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या पुढाकारातून सहा वर्षांपूर्वी उच्च अनुवंशिकतेच्या दुधाळ गाईंसाठी होल्स्टिन गायीचे भ्रूण अमेरिकेतून आयात केले होते. ते भ्रूण द्रवनत्रामध्ये साठविण्यात आले होते. ३० जुलै २०१८ ला ट्रस्टच्या शारदानगर येथील शेतीफार्मवरील आठ संकरीत गायींमध्ये हे भ्रूणप्रत्यारोपण पुणे येथील जे. के. बोव्हाजेनिक्समधील शास्त्रज्ञ डॉ. शाम झंवर आणि डॉ. विनोद पाटील यांनी केले. २९ सप्टेंबर २०१८ ला या आठ गायींची सोनोग्राफी करण्यात आली. या सोनोग्राफीतून आठ पैकी सात गायी गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. या भ्रूणाची वाढ योग्य पद्धतीने होत आहे. येत्या मे महिन्यात या संकरित गाई विणार आहेत. प्रयोगावर डॉ. धनंजय भोईटे, डॉ. रतन जाधव, डॉ. पिसाळ, डॉ. सचिन सोरटे, प्रा. संदीप पवार, हरिभाऊ जराड, अशोक काटे, पशुसंवर्धन महाविद्यालयाचे विद्यार्थी आदींचे पथक लक्ष ठेवून आहे.

सात गर्भवती गायींची खूषखबर शरद पवार यांच्या कानावर जाताच त्यांनी हा प्रयोग किती महत्त्वाचा आहे हे ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले. दूध उत्पादन वाढीसाठी असे प्रयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल सर्वांचे कौतुक केले.

गोठीत केलेले भ्रूण दीर्घ काळानंतर सरोगेट गायीमध्ये वापरायचे झाल्यास त्याच्या यशस्वितेचे प्रमाण हे ४० टक्क्यांपर्यंत मिळते, मात्र बारामतीतील हे प्रमाण निश्चितच सुखावणारे आहे. बारामतीतील तज्ज्ञांच्या पथकाने गर्भ प्रत्यारोपणासाठी योग्य अशा सरोगेट गायींची घेतलेली देखभाल महत्त्वाची ठरली आहे, असे जे. के. बोव्हाजेनिक्सचे शास्त्रज्ञ  डॉ. शाम झंवर यांनी सांगितले.

या प्रयोगाने खूप आशा उंचावल्या आहेत. आपल्याकडील खिलार, गीर, देवणी, साहिवाल अशा देशी आणि त्यातील उच्च प्रतीच्या दुधाळ गायींची अनुवंशिकता वाढविण्याच्या दृष्टीने या प्रयोगाने चांगली संधी निर्माण करून दिली आहे, असे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी
 प्रा. नीलेश नलावडे, सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरीचे प्रमुख डॉ. धनंजय भोईटे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...