agriculture news in marathi, Survey order for orange fruitdrop | Agrowon

संत्रा फळगळीच्या सर्वेक्षणाचे आदेश
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सर्वेक्षणाच्या आदेशाबद्दल प्रशासनाचे आभार. मात्र या सोबतच २८ मे २०१७ रोजी झालेला अवेळी पाऊस, नंतर पावसाने दिलेला खंड व वाढलेले तापमान, यामुळे मृग बहारात बहुतांश शेतकऱ्यांच्या बागेत फळधारणा झाली नाही. मृग बहारातील नुकसानीचेदेखील सर्वेक्षणाचे आदेश प्रशासनाने द्यावेत.
- रमेश जिचकार, संत्रा उत्पादक शेतकरी.

अमरावती : आंबीया बहारातील संत्र्याच्या फळगळतीमुळे संत्रा पट्ट्यात सुमारे ८५ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले होते. या संदर्भात ॲग्रोवनमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत प्रशासनाकडून संयुक्‍त सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रतिकूल हवामानाचा फटका बसत यावर्षी आंबीया बहारातील संत्र्याची फळगळ झाली होती. दोन महिने पावसाने दिलेला खंड, त्यामुळे तापमानात वाढ झाली. परिणामी संत्री बॉईल झाली. त्याचा फटका बसत फळगळ होऊ लागली. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यासोबत ३० लाख रुपयांत बागेचा सौदा केला असला तरी फळगळीमुळे उत्पादन कमी होणार असल्याने व्यापाऱ्यांनी केवळ तीन लाख रुपये शेतकऱ्यांना दिले. याविषयी सविस्तर वृत्त ॲग्रोवनने २८ ऑक्‍टोबर रोजी प्रकाशित केले होते. शेतकऱ्यांशी चर्चा केली असता फळगळीमुळे संत्रा पट्ट्यात ८५ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाकडून संत्रा बागेच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल आणि कृषी विभागाकडून हे संयुक्‍त सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

आंबीया बहारातील संत्रा फळगळीविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर महसूल व कृषी विभागाकडून संयुक्‍त सर्वेक्षण केले जात असून काही ठिकाणचे अहवालदेखील प्राप्त झाले आहेत, असे अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...