agriculture news in marathi, survey of pink bollworn affected crop in jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे सुरूच
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017
आमच्याकडे ९० टक्के पूर्वहंगामी कपाशी होती. ती गुलाबी बोंडअळीग्रस्त असल्याने ती काढून फेकली. आता कपाशीच नसल्याने पंचनामे होणार कसे? पंचनामे सरसकट केल्याचे म्हटले जात असले तरी धरसोड पद्धतीने ते काम सुरू आहे. 
        - अनिल सपकाळे, शेतकरी, करंज, जि. जळगाव.
जळगाव : गुलाबी बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे अजूनही सुरूच आहेत. यातच ज्या क्षेत्रात कपाशीचे पीक काढून नष्ट केले तेथे काही अवशेष सापडले तर नुकसान ग्राह्य धरून पंचनाम्यात तशी नोंद केली जात आहे. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती मिळाली आहे.
 
जिल्ह्यात चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. यातील सुमारे चार लाख हेक्‍टवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. 
जिल्ह्यात मध्यंतरी कृषी विभागाकडून बोंडअळीच्या नुकसानीसंबंधी अर्ज कपाशी बियाण्याच्या रॅपर व बिलासह स्वीकारले जात होते. पंचनाम्यांबाबत एच अर्ज बियाणे कायदानुसार स्वीकारले जात होते. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नियोजन समितीच्या बैठकीत तक्रारी केल्या.
 
यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, असे स्पष्ट केले. या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने कपाशीच्या नुकसानीसंबंधी ११ डिसेंबरपासून कार्यवाही सुरू केली. क्षेत्र मोठे व यंत्रणा तोकडी यामुळे पंचनाम्यांना उशीर होत आहे.
 
कृषी सहायक, तलाठी यांची १५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकच सहायक व तलाठी यांच्यावर तीन ते चार गावांमध्ये पंचनामे करण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाने गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कपाशी काढून क्षेत्र रिकामे करावे, पऱ्हाटी नष्ट करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक नष्ट केले. आता शेतात कपाशीच नसल्याने पंचनामे करण्यास काही ठिकाणी शासकीय कर्मचारी नकार देत आहेत. ते शेतात यायला नकार देतात, अशा तक्रारी आहेत. 

जिल्ह्यात १० डिसेंबरपूर्वी काही ठिकाणी एच अर्जानुसार नुकसानग्रस्त कपाशीचे पंचनामे झाले. पण नंतर सरसकट पंचनामे सुरू झाले. आजघडीला तीन लाख हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. आणखी लाखभर हेक्‍टरचे पंचनामे राहिले आहेत. त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून मिळाली. 

 

इतर ताज्या घडामोडी
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या...पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...