सीआयसीआरच्या प्रतिनिधींनी केली अकोल्यातील कपाशी पिकाची पाहणी

बोंडअळी प्रादुर्भावाची पाहाणी
बोंडअळी प्रादुर्भावाची पाहाणी
अकोला  ः देशभर गाजत असलेल्या बोंड अळी प्रादुर्भाव प्रकरणाची दखल घेत बुधवारी (ता. २९) केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या (सीअायसीअार) प्रतिनिधींनी जिल्ह्यात विविध भागांत भेटी देऊन कपाशी पिकाची पाहणी केली.
 
मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो, तसेच कौलखेड जहाँगीर शिवारातील कपाशीच्या पिकाची पाहणी करून बोंड अळीबाबत शेतकरी व तज्ज्ञांकडून माहिती घेतली.जिल्ह्यात बोंड अळीमुळे हजारो हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले अाहे. विशेषतः प्री-मॉन्सून लागवड झालेल्या कपाशीवर बोंड अळीने जोरदार हल्ला चढवला असल्याने उत्पादकता मोठ्या प्रमाणात घसरली.
 
ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीही केल्या. पिकाची पाहणी करून तातडीने मदत मिळावी, या मागणीची निवेदने मोठ्या प्रमाणावर दिली जात आहेत.अशा परिस्थितीत सीअायसीअारच्या पथकाने बुधवारी जिल्ह्यातील कापूस पट्ट्यात भेट देऊन माहिती घेतली.यामध्ये सीअायसीअारचे प्रतिनिधी डॉ. फंड, डॉ. चिन्नाबाबू नाईक यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
 
सकाळी हे पथक मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गावात गेले. तेथे शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. बोंड अळीबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली. दुपारी ही समिती कौलखेड जहाँगीर येथे पोचली. तेथील शिवारात जाऊन माहिती घेतली. ही समिती अापला अहवाल त्यांच्या वरिष्ठांना देणार अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com