agriculture news in marathi, Suspend to veterinary doctor who not live in The main office | Agrowon

मुख्यालयी न राहणाऱ्या पशुवैद्यकांचे निलंबन करा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

नागपूर : पशुवैद्यक सरकारकडून पगार घेतात पण गावामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलबध राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनात अडथळा निर्माण होत आहे. गावात राहण्याचा पगार घेऊन शहरात दिवस घालविणाऱ्या पशुवैद्यकांना निलंबित करा, अशी सूचना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकार तसेच पशुसंवर्धन आयुक्तांना केली.

नागपूर : पशुवैद्यक सरकारकडून पगार घेतात पण गावामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलबध राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनात अडथळा निर्माण होत आहे. गावात राहण्याचा पगार घेऊन शहरात दिवस घालविणाऱ्या पशुवैद्यकांना निलंबित करा, अशी सूचना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकार तसेच पशुसंवर्धन आयुक्तांना केली.

रेशीमबागेतील ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनातील दुग्ध विकास परिषदेत ते बोलत होते. पुणे दिवसाकाठी ३५ लाख लिटर, कोल्हापूर २८ लाख , सांगली १७ लाख लिटर दुग्ध उत्पादन करत असताना, संपूर्ण विदर्भात केवळ ८ लाख लिटर प्रतिदिवस दुधाचे उत्पादन होते. हे चित्र बदलू शकते. यासाठी उत्तम दर्जाचे पशुखाद्य शेतकऱ्यांनी वापरावे, असा सल्ला गडकरींनी दिला.

सक्षम झाल्याशिवाय विदर्भ वेगळा नाही
आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळे राज्य घेणे योग्य होणार नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्‍वासन दिले होते. केंद्र सरकारला साडेतीन वर्षे व राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही भाजपकडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतेही पाऊल उचलले नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सक्षम विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. विदर्भातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी दुग्ध उत्पादनाची जोड शेतकऱ्याला मिळण्याची गरज आहे. यामुळे २०१९ पूर्वी विदर्भ वेगऴा होण्याची आशा आता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

उद्योग राज्यमंत्र्यांची सहकार विकास महामंडळाच्या स्टॉलला भेट
उद्योग राज्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी ॲग्रो व्हिजन प्रदर्शनातील राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या स्टॉलला भेट देत विविध योजनांची माहिती घेतली. सहकार विकास महामंडळाच्या वतीने सहकारी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न देशाअंतर्गत केला जात आहे. या वेळी सहकार विकास महामंडळाचे उपसंचालक सचिन शर्मा यांनी त्यांना महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

इतर ताज्या घडामोडी
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस...आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा...
फुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
नगर जिल्ह्यात बियाण्यांची अवघी दहा...नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची...
सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे...सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना...
तूर नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा खुलासा...नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू...
कोल्हापूर जिल्ह्याचा ३६५ कोटींचा योजना...कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या...
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...