agriculture news in marathi, suspicion of bogus insecticide reached in Vidarbha, maharashtra | Agrowon

बोगस कीटकनाशके विदर्भात पोचल्याचा संशय
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 ऑगस्ट 2018

परवान्यात नमूद नसतांना कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याची बाब प्रथमदर्शनी समोर आल्याने १६ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच संबंधित कीटकनाशक बोगस की खरे हे ठरविता येईल.
- नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ.

नागपूर  : एका कंपनीने विदर्भातील आपल्या वितरकांकडून कीटकनाशक पुन्हा मागविल्याने ते बोगस असल्याची चर्चा रंगली होती; परंतु अकोला कृषी विभागाने केलेल्या चाचणीत ते उत्पादन स्वीकृत (पास) ठरले असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कीटकनाशक माघारी बोलावण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आव्हान कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच विदर्भात लगतच्या राज्यामधून कपाशीच्या बोगस व एचटी बियाण्यांचा शिरकाव झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणे पोचविण्यात आले. त्यानंतर पोटॅश व डीएपीच्या नावाखाली बोगस खतेदेखील सर्रासपणे जिल्ह्यामध्ये दाखल झाले. ‘सेंद्रिय’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यात आली. आता बियाणे व खतांच्या विक्रीनंतर बोगस कीटकनाशकांचीदेखील सर्रासपणे  विक्री सुरू झाली आहे.

हरियानातील गुडगाव येथील एका कंपनीच्या नावाचा वापर करून नागपुरात बनावट कीटकनाशक उपलब्ध करुन देण्यात आले. त्यानंतर अकोला येथून विदर्भातील बहुतांश जिल्हयात या कीटकनाशकांची विक्री करण्यात आली. याबाबतची तक्रार झाल्यानंतरदेखील कृषी विभागाने कानावर हात ठेवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार कृषी विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या ‘कानी` देखील आहे. मात्र, अजूनही ज्या पद्धतीने कारवाई होणे अपेक्षित त्या पद्धतीने कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता कृषी विभागाच्या गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले असून, कारवाईत साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चादेखील केली जात आहे.
 

नागपुरातील त्या व्यावसायिकाला अभय?
अकोल्यातील वितरकाने नागपुरातील ज्या व्यावसायिकाकडून हे कीटकनाशक खरेदी केले. त्या व्यवहाराच्या सर्व लेखी पुरावे व पावत्या वितरकाकडे आहेत. त्यानंतरही संबंधित व्यावसायिकाविरोधात नागपुरात कृषी विभागाच्या गुणवत्ता शाखेकडून तसेच कृषी विकास अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले कीटकनाशकाचे नमुने ‘पास’ झाले आहेत. तरीसुद्धा नागपुरातील ज्या व्यावसायिकाने अकोल्यातील वितरकाकडे हा साठा पाठविला त्याच्याकडे विक्री परवान्यात हे कीटकनाशक समाविष्ट नाही. त्यामुळे पुढील कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार केली जाईल, अशी माहिती अकोला येथील गुणवत्ता निरीक्षक मिलिंद जवंजाळ यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...