agriculture news in Marathi, swabhimani block expressway, Maharashtra | Agrowon

‘स्वाभिमानी’ने रोखला महामार्ग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

कोल्हापूर : गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी गुुरुवारी (ता. १९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळूर महामार्ग किणी पथकर नाक्‍यानजीक सुमारे अर्धा तास रोखून धरला. सकाळी पोलिसांनी किणीकडे येणाऱ्या अनेक गावांच्या रस्त्यावर नाकेबंदी करून गावागावांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवल्याने मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

कोल्हापूर : गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी गुुरुवारी (ता. १९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळूर महामार्ग किणी पथकर नाक्‍यानजीक सुमारे अर्धा तास रोखून धरला. सकाळी पोलिसांनी किणीकडे येणाऱ्या अनेक गावांच्या रस्त्यावर नाकेबंदी करून गावागावांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवल्याने मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

पोलिसांना चकवा देत हजारो कार्यकर्ते किणी गावातील पाटलांचा वाडा या ठिकाणी जमा झाले. यात महिलाही अग्रेसर होत्या. जनावरांसह एक किलोमीटर असणाऱ्या किणी पथकर नाक्‍यावर सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांचा जथ्था किणी पथकर नाक्‍यावर पोचला. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला. संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करीत कोणत्याही परिस्थितीत हिंसक आंदोलन करू नये, असे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

सावकार मादनाईक, जालिंदर पाटील, भगवान काटे आदी नेत्यांनी सरकारच्या दूध दर आंदोलन चिरडून टाकण्याच्या भूमिकेवर चौफेर हल्ला चढविला. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही. जोपर्यंत संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा होऊन समाधानकारक तोडगा निघणार नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

अर्धा तास संपूर्ण महामार्ग रोखण्यात आला. भाषणे झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. पोलिसांनीही कोणत्याही कार्यकर्त्यांना अटक करणार नाही, सकाळी ज्यांना अटक केली आहे त्यांनाही सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेत असल्याचे सांगत रस्ता मोकळा करून दिला.

तणावाचे चार तास
चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर किणी पथकर नाका परिसरात मोठा तणाव होता. पाचशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा प्रमुख अधिकाऱ्यांसह तैनात होता. गावोगावीच कार्यकर्त्यांना अडवून ठेवण्याची भूमिका घेत असल्याने आंदोलकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. सकाळी काही प्रमाणात येणाऱ्या कार्यकर्त्यांना ते आले की अटक करण्याचे सत्र सुरू केले. यामुळे किणी येथील टोलनाक्‍यावर आंदोलक व पोलिसांत तणाव निर्माण झाला. प्रचंड जमाव असल्याने पोलिसांनी नमते घेत संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन आंदोलन काही काळ करण्याची परवानगी दिली. यामुळे तणाव निवळला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणीही काही वेळ रास्ता रोको करण्यात आला.

दूध संकलनात घटच
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलनात घटच होती. सरासरी केवळ पंचवीस टक्के इतकेच दूध संकलन झाले. चक्का जाम आंदोलन असल्याने टॅंकरवर पुन्हा दगडफेकीची शक्‍यता असल्याने दूध संघांनीही दुधासाठी दुग्ध संस्थांना फारसा आग्रह केला नाही. कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने टॅंकरचे संभाव्य नुकसान गृहीत धरून संघांनी गुरुवारी सावध पवित्रा घेतला. यामुळे दुधाच्या संकलनात मोठी घट झाली. आंदोलन सुरू झाल्यापासून केवळ दुसऱ्या दिवशीच चाळीस टक्क्‍यापर्यंत संकलन झाले होते. यानंतर घटच होत असल्याचे चित्र आहे. अनेक दुग्ध संस्था चार दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. गुरुवारी अंदाजे केवळ दोन लाख लिटरपर्यंतचे संकलन झाल्याचे दूध संघांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

इतर बातम्या
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
शेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर...नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढलासांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
लातूर विभागात होणार चौदाशे शेतीशाळालातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर...
कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी...नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
पुणे विभागात राष्ट्रीय फलोत्पादन...पुणे   ः कृषी विभागामार्फत चालू वर्षी...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल...परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...