agriculture news in marathi, Swabhimani demands to start giving crop loan to farmers | Agrowon

पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच शेतीमालास कमी भाव मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ खरीप पीक कर्ज वाटप सुरू करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच शेतीमालास कमी भाव मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ खरीप पीक कर्ज वाटप सुरू करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना जिल्ह्यातील बॅंकांनी अद्याप पीक कर्ज वाटप सुरू केलेले नाही. पीक कर्ज मागणीसाठी बॅंकेत गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. जूननंतर कर्ज वाटप केले जाईल, असे सांगितले जात आहे. अनेक बॅंकांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी अद्याप बॅंकेत लावलेली नाही. कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या फलकावर लावाव्यात. नव्याने मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज देण्यात यावे.

सद्यस्थितीत कर्ज दिल्यास खरीप पेरणीसाठी बी, बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपयोग होईल, अन्यथा सावकाराकडे जाण्याची वेळ येईल. त्यामुळे बॅंकांना कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, किशोर ढगे, राजाभाऊ आवरगंड, केशव आरमळ, भास्कर खटिंग, डिगांबर पवार, अमोल जवंजाळ,रा जू शिंदे, रामकिशन गरुड, संतोष पोले, गजनान गरुड यांनी जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...