agriculture news in marathi, Swabhimani Movement with self-respecting bullock cart | Agrowon

स्वाभिमानी संघटनेचे बैलगाडीसह आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

सिल्लोड, जि. औरंगाबाद : मराठवाडा व विदर्भाला दुष्काळी घोषित करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सिल्लोड तालुक्‍यातील पालोद येथे शनिवारी (ता. २०) चक्‍का जाम आंदोलन करण्यात आले.

सिल्लोड, जि. औरंगाबाद : मराठवाडा व विदर्भाला दुष्काळी घोषित करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सिल्लोड तालुक्‍यातील पालोद येथे शनिवारी (ता. २०) चक्‍का जाम आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, तालुकाध्यक्ष सुनील सनान्से यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामुळे एक किलोमीटर लांबपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. सिल्लोड तालुक्‍यातील काही गावांत तर मागच्या वर्षीचे सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे टॅंकर अद्याप सुरूच आहे. यंदा शेतकऱ्यांना १० टक्‍केसुद्धा उत्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी २० ऑक्‍टोबर रोजी मराठवाडा विदर्भात चक्का जाम आंदोलन घोषित केले होते.

शासनाने लवकर तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मारोती वराडे यांनी या वेळी दिला. या आंदोलनात स्वाभिमानीचे तालुका संघटक युवराज वराडे, सुनील सनान्से, बालाजी शिंदे, भगवान खंबाट, गजानन पालोडकर, संजय गव्हाणे, विनोद काटकर, गणेश शिंदे, सोमिनाथ कळम, सुनील साबळे, गजानन मुरकुटे, दिलीप मुरकुटे, लक्ष्मण मुरकुटे, अजबराव दौड, जावेद शेख, रमेश हिंगरे, आजीनाथ सपकाळ, पंडित सोन्ने, अशोक पिसाळ, सह असंख्य शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वैजापुरातही आंदोलन
वैजापूर तालुक्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वैजापूर-गंगापूर चौफुलीवर शनिवारी (ता. २०) रास्ता रोको केला.

इतर बातम्या
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...