agriculture news in marathi, swabhimani to protest on 17th sugarcane issue | Agrowon

उसाच्या उचल कपातीविरोधात ‘स्वाभिमानी’चा १७ ला मोर्चा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : उसाच्या ठरलेेल्या उचलीत साखर कारखान्यांनी कपात करून प्रतिटन २५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १७ फेब्रुवारीला येथील सहसंचालक साखर यांच्या कार्यालयावर खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सावकर मादनाईक व जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिली. 

कोल्हापूर : उसाच्या ठरलेेल्या उचलीत साखर कारखान्यांनी कपात करून प्रतिटन २५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १७ फेब्रुवारीला येथील सहसंचालक साखर यांच्या कार्यालयावर खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सावकर मादनाईक व जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिली. 

सावकर मादनाईक म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेच्या दराचे कारण पुढे करून प्रतिटन ५०० रुपये कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कपात करून शेतकऱ्यांच्या खात्यावर २५०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे. यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारने मध्यस्थी करून दरात कपात करण्यात देऊ नये, अशी मागणीदेखील केली होती. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी टनामागे सरासरी ५०० रुपयांची कपात केले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मिटलेला होता. मात्र आता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड करून बिले वर्ग केली आहेत, त्या साखर कारखान्यांवर त्वरित गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र तसे होताना दिसत नाही. 

साखरेच्या दरात थोडीशी सुधारणा झालेली दिसत आहे. मुळात साखरेच्या दरात ८ रुपये किलोमागे पडले आहेत. त्यामुळे राज्य बॅंकेने साखरेचे मूल्यांकनदेखील कमी केले आहे. केवळ २ रुपये दरात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. गेल्या १० दिवसांपासून ठरलेल्या दरासाठी लढत आहोत. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी कपातीची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, तसेच ज्या साखर कारखान्यांनी कपात केली आहे. त्या साखर कारखानदारांवर त्वरित फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी हा मोर्चा आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...