‘सदाभाऊं’च्या संघटनेची ‘स्वभिमानी’शी होणार स्पर्धा

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेची घोषणा केली असली, तरी या संघटनेचा प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनाच असणार आहे.

श्री. खोत यांनी संघटनेची घोषणा करताना इतर कोणत्याही विरोधी पक्षावर टीका न करता केवळ खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटना यांच्यावरच जोरदार टीका केली. यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये इतर गटांची, पूरक पक्षांशी साथ घेऊन श्री. खोत यांची संघटना ‘स्वाभिमानी’च्या विरोधात लढेल अशी शक्‍यता आहे.

‘स्वाभिमानी’ने श्री. खोत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केल्यानंतर त्यांनी काही भागात जाऊन आपली ताकद आजमावली. जुन्या व श्री. शेट्टी यांच्यावर नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच फोकसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. ज्यांना ‘स्वाभिमानी’तून डावलले जात आहे. अशा कार्यकर्त्यांशी जवळीक साधून त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले.

काही दिवस अंदाज घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवडही केली. बहुतांशी पदाधिकारी हे ‘स्वाभिमानी’तील साथीदार आहेत. अनेक नावे नवखी असली तरी त्यांना बळ देण्याचे आश्‍वासन श्री. खोत यांनी देऊन नव्या संघटनेसाठी कामाला लागा, असा आदेश दिला आहे.

नवी संघटना काढताना त्यांनी कोणत्याही पक्षावर टीका केली नाही हे विशेष. इतर अनेक शेतकरी संघटनांमध्ये श्री. खोत यांच्या संघटनेची भर पडली असली, तरी कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे मोठे आव्हान या संघटनेला पार पाडावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com