agriculture news in marathi, swabhimani shetkari sangatwan declares a Campaign for farmers | Agrowon

मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार : 'स्वाभिमानी'ची शेतकऱ्यांसाठी मोहिम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे : वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शेतीमालाचे दर मातीमाेल झाल्याने शेतकरी आर्थिक विंवचनेत असून, आत्महत्यांकडे वळत आहे. शेतकऱ्यांना मानसिक बळ देत आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र दिना(ता. १ मे)पासून ‘मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार...’ अभियान राबविणार अाहे. अभियानाचा प्रारंभ धर्मा पाटील यांच्या गावापासुन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. १२) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पुणे : वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शेतीमालाचे दर मातीमाेल झाल्याने शेतकरी आर्थिक विंवचनेत असून, आत्महत्यांकडे वळत आहे. शेतकऱ्यांना मानसिक बळ देत आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र दिना(ता. १ मे)पासून ‘मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार...’ अभियान राबविणार अाहे. अभियानाचा प्रारंभ धर्मा पाटील यांच्या गावापासुन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. १२) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दाेनदिवसीय बैठक बुधवार (ता. ११) आणि गुरुवार (ता. १२)दरम्यान झाली. या बैठकीत झालेल्या विविध निर्णयांची माहिती खा शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी संघटनेचे नविनिर्वाचित अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेत प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते, माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पाेफळे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील आदी उपस्थित हाेते.

या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी देशातील १३४ शेतकरी संघटनांनी एकत्र येत खासगी विधेयक लाेकसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. कर्जमुक्ती विधेयक २०१८ नावाचे हे शेतकऱ्यांचे खासगी विधेयक असणार असून, या विधेयकाची मांडणी आणि चर्चा व्हावी. यासाठी १ मेच्या ग्रामसभांमध्ये ठराव करण्यात येणार आहे. तर १० मे राेजी देश पातळीवर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. हे निवेदन लाेकसभा आणि राज्यसभेच्या सभापतींच्या नावे असणार आहे.’’

माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते म्हणाले, ‘‘प्रत्येक राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात शेतकरी प्राधान्यक्रमावर असताे. मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. स्वांतत्र्य मिळाल्यानंतर कृषी, सेवा आणि उद्याेगांची विकासदर अनुक्रमे ५२, ३३ आणि १४ टक्के हाेता. ताे आता २०१८ ला अनुक्रमे १७, ५४ आणि १९ टक्के झाला आहे. यामुळे सरकाचे किती दुर्लक्ष शेती क्षेत्राकडे हाेत आहे. हे स्पष्ट हाेत आहे. या आकडेवारीचा आधार घेत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या खासगी विधेयक तातडीने मंजूर करावे.’’

काॅंग्रेस-भाजपचे उपाेषण म्हणजे साै चुहे खाके...
सध्या कॉँग्रेस-भाजपचे उपाेषण म्हणजे ‘साै चुहे खाके बिल्ली चली हज काे’ असा प्रकार आहे. भाजपला संसदेचे कामकाज चालूच द्यायचे नव्हते. याचा मी साक्षीदार आहे. भाजपचे आताचे उपाेषण म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. त्यांनी उपाेषणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सेवाग्राम आणि पाचनरला जावे, असा टाेला खासदार शेट्टी यांनी दोन्ही पक्षांना लगावला. 

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...