Agriculture News in Marathi, swabhimani shetkari sanghatana Agitation, Budhana district | Agrowon

‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन
गोपाल हागे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017
बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झाले अाहेत. यातील असलेल्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा, या मागणीसाठी शनिवारी (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बाजार समितीच्या वरवट बकाल येथील उपबाजारासमोर हंगामा अांदोलन करण्यात अाले.
 
बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झाले अाहेत. यातील असलेल्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा, या मागणीसाठी शनिवारी (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बाजार समितीच्या वरवट बकाल येथील उपबाजारासमोर हंगामा अांदोलन करण्यात अाले.
 
संग्रामपूर तालुक्यात तूरखरेदी केंद्रावर झालेल्या घोळप्रकरणी स्वाभामानी शेतकरी संघटनेने वारंवार अांदोलने केली. त्यामुळे खरेदी-विक्री संघाच्या संचालकांसह व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात अाले. यात अारोपी असलेल्या व्यापाऱ्यांचे परवाने बाजार समितीने रद्द करण्याची मागणी संघटनेने केली अाहे.
 
मात्र अद्यापही त्यावर कारवाई झाली नसल्याने शनिवारी अांदोलन करण्यात अाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अाघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोल्हर, संतोष गाळकर, रोशण देशमुख, अनंता मानकर, रामदास भोपळे अादी कार्यकर्ते या अांदोलनात सहभागी झाले होते.
 
या अांदोलनाची दखल घेत बाजार समिती सभापती व सचिवांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्याचे सांगितले. संबंधित व्यापाऱ्यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर २२ अाॅक्टोबरपर्यंत नियमानुसार व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असे लेखी अाश्वासन दिले.    
 
ठेचा-भाकर आंदोलन करणार
शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापसाला भाव, सात-बारा कोरा करा या व इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी संघटना बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा-भाकर आंदोलन करणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...