Agriculture News in Marathi, swabhimani shetkari sanghatana leader ravikant Tupkar demand file cases against minister, washim district | Agrowon

शेतकरी आत्महत्येला जबाबदार मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

मानोरा, जि. वाशीम ः सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

वेळीच दखल घेतली गेली असती, तर या शेतकऱ्याचा बळी गेला नसता. ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्याच आहे, असा आरोप करतानाच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, असेही श्री. तुपकर या वेळी म्हणाले.

मानोरा, जि. वाशीम ः सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

वेळीच दखल घेतली गेली असती, तर या शेतकऱ्याचा बळी गेला नसता. ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्याच आहे, असा आरोप करतानाच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, असेही श्री. तुपकर या वेळी म्हणाले.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेतल्यानंतरही मंत्र्यांनी कुठलीच दखल घेतली नाही. यामुळे सोयजना येथील कर्जबाजारी शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळ (वय ५६) यांनी यवतमाळ येथील एका लॉजमध्ये ६ डिसेंबर रोजी अात्महत्या केली. शोकाकुल मिसाळ कुटुंबीयांचे तुपकर यांनी सांत्वन केले.

यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सरकारचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरत आहे. शेतकरी मिसाळ यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात सदाभाऊ खोत व राजकुमार बडोले यांची भेट घेतली. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा उल्लेख शेतकऱ्याने केला आहे.

मेट्रोची गरज नाही. डिजिटल इंडियाही नको, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा म्हणजे ते आत्महत्या करणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्याने म्हटले होते. खऱ्या अर्थाने हे मंत्रीच शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही श्री. तुपकर यांनी केली.

कृषिपंपांची वीज जोडू नका, त्यांच्याकडून सक्तीची वसुली करू नका; अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही श्री. तुपकर यांनी या वेळी दिला. या पत्रकार परिषदेला वाशीमचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, नेते विठ्ठल घाडगे, श्याम पवार, शिवसेना तालुकाप्रमुख रवी पाटील अादी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...