agriculture news in Marathi, Swabhimani shetkari sanghtna shut down sugarcane choking, Maharashtra | Agrowon

कोल्हापूरसह कर्नाटक सीमाभागात ‘स्वाभिमानी’ने ऊसतोडी बंद पाडल्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद झाल्यानंतर स्वभिमानी शेतकरी संघटनेने पश्‍चिम महाराष्ट्राबरोबर उत्तर कर्नाटकातही ऊसतोडणी बंद करण्याचे आंदोलन सुरू केले. यामुळे गळीत हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असणाऱ्या कारखान्यांना ब्रेक लागला. हंगामाच्या प्रारंभीच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवल्याने कारखान्यांनीही कर्मचाऱ्यांना सबुरीने ऊसतोडीच्या सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद झाल्यानंतर स्वभिमानी शेतकरी संघटनेने पश्‍चिम महाराष्ट्राबरोबर उत्तर कर्नाटकातही ऊसतोडणी बंद करण्याचे आंदोलन सुरू केले. यामुळे गळीत हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असणाऱ्या कारखान्यांना ब्रेक लागला. हंगामाच्या प्रारंभीच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवल्याने कारखान्यांनीही कर्मचाऱ्यांना सबुरीने ऊसतोडीच्या सूचना दिल्या आहेत.

यंदाच्या हंगामातील ऊसदर जाहीर करण्यासह गेल्या हंगामातील थकीत बिले देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने दराचे आंदोलन सीमाभागात पेटले आहे. सोमवारी (ता.२९) वाहने रोखण्यात आली. तसेच काही ठिकाणी तोडण्याही थांबविल्या. दोन दिवसांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारदगा, भोज, बेडकीहाळ, मांगूर, गळतगा, आडीसह अन्य ठिकाणी उसाची वाहने रोखली.

आडी येथील मल्लया डोंगराच्या पाठीमागे राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा उसाची वाहने रोखून ट्रॅक्‍टर-ट्रॉलीतील हवा सोडण्यात आल्याने रात्रीपासून सोमवारी दिवसभर वाहने थांबून होती. ऊस वाहतूक रोखल्याच्या धसक्‍याने विविध ठिकाणी तोडण्याही थांबल्या. भोगावती (ता. राधानगरी) कागल येथे स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचे ट्रक थांबवून चाकातील हवा सोडली. कोणत्याही परिस्थितीत निर्णय झाल्याशिवाय ऊसतोड सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने अनेक वाहने रस्त्यांवर थांबून होती.

ऊस तोडून रात्री ट्रक कारखान्याकडे जात असल्याचे पाहून रात्रभर जागून कार्यकर्ते वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यातील ऊसपट्ट्यात आहे.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...