agriculture news in Marathi, swabhimani shetkari sanghtna in trouble due to prakash awades stand, Maharashtra | Agrowon

प्रकाश आवाडेंच्या भूमिकेमुळे ‘स्वाभिमानी’ची अडचण?
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : कारखानदारांशी समान अंतर ठेवून ऊस दरासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य कारखाना असलेल्या जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समोरच व्यासपीठावर येथून पुढे आम्ही राजू शेट्टी यांच्याबरोबर एफआरपीच्या लढ्यात एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. येथून पुढे शेट्टी व आवाडे एकत्र असतील असे सांगितल्याने भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता आहे. ऊस दराच्या निमित्ताने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आवाडेंना स्वाभिमानी स्वीकारणार का?

कोल्हापूर : कारखानदारांशी समान अंतर ठेवून ऊस दरासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य कारखाना असलेल्या जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समोरच व्यासपीठावर येथून पुढे आम्ही राजू शेट्टी यांच्याबरोबर एफआरपीच्या लढ्यात एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. येथून पुढे शेट्टी व आवाडे एकत्र असतील असे सांगितल्याने भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता आहे. ऊस दराच्या निमित्ताने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आवाडेंना स्वाभिमानी स्वीकारणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

जवाहर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा प्रारंभ शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी श्री. आवाडे यांनी हे भाष्य केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही श्री. आवाडे यांच्या अनपेक्षित भूमिकेने बुचकळ्यात पडली आहे. स्वाभिमानीच्या इतिहासात कोणत्याही कारखानदाराने स्वभिमानीच्या भूमिकेला असा जाहीर पाठिंबा दिला नव्हता. यामुळे आवाडेंची स्वाभिमानीशी जवळीक करण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या सच्चा कार्यकर्त्यास कितपत रुचतो हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३४०० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी केल्याने ऊस तोडी बंद आहेत. कारखानदार प्रतिनिधी व स्वभिमानी शेतकरी संघटनेत जोरदार संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. आवाडे यांच्याकडून हे वक्‍तव्य आल्याने भुवया उंचावल्या आहेत.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये संघटना काही कारखानदारांशी जवळीक साधून दराबाबत समझोता करते. अथवा ठराविकच कारखान्याच्या विरोधात आक्रमक आंदोलने करते हा आरोप स्वाभिमानीवर सातत्याने होत आला आहे. जो सर्वाधिक दर देइल तो कारखाना शेतकऱ्यांचा महत्त्वाचा, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटना या आरोपाला उत्तर देत असते. पण उस दराचे रान पेटलेले असतानाच एखाद्या कारखानदारानेच कोणतीही भीडभाड न ठेवता थेट स्वाभिमानीबरोबरच लढणार असे म्हटल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही कोणता ‘स्टॅंड’ घ्यावा याचे उत्तर सापडलेले नाही. 

खासदार पवार समोर असताना हे वक्तव्य झाल्याने हे याला अनेक भूमिकेतून बघितले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतांशी कारखानदार व्यासपीठावर असतनाही अनुपस्थित असणाऱ्या शेट्टींना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय अनाकलणीय असल्याने व्यासपीठावरील कारखानदारही गोंधळून गेले. 

 स्वाभिमानीच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून ‘जवाहर’ ने संघटनेला अपेक्षित दर जाहीर केल्यास संघटनेची काय भूमिका रहाणार, भविष्यात श्री. शेट्टी आवाडेंच्या राजकारणात त्यांना मदत करणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस...आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा...
फुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
नगर जिल्ह्यात बियाण्यांची अवघी दहा...नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची...
सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे...सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना...
तूर नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा खुलासा...नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू...
कोल्हापूर जिल्ह्याचा ३६५ कोटींचा योजना...कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या...
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...