स्वाभिमानी उचलणार चायरे भावंडाच्या शिक्षणाचा भार

स्वाभिमानी उचलणार चायरे भावंडाच्या शिक्षणाचा भार
स्वाभिमानी उचलणार चायरे भावंडाच्या शिक्षणाचा भार

यवतमाळ : नरेंद्र मोदी सरकार आत्महत्येला जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या राजूरवाडीतील शंकर चायरे या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. १५) राजूरवाडीत भेट घेतली. या वेळी चायरे यांच्या तीन मुली व एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा संघटनेच्या वतीने करण्यात आली.  राजूरवाडीतील शंकर चायरे यांच्याकडे साडेनऊ एकर शेती. वनपरिक्षेत्रानजीक असलेल्या या शेतीला वन्यप्राण्यांचा मोठा त्रास होता. त्यामुळे शंकर चायरे यांना सातत्याने जागलीवर जावे लागत होते. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीत अखेरपर्यंत त्यांचे नाव आले नाही. कापसावर देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्याच्या मदतीबाबतही कोणताच निर्णय सरकारकडून होत नव्हता. जयश्री तसेच भाग्यश्री चायरे या दोघी बीएस्सीला, धनश्री बारावी, तर मुलगा आकाश हा नववीला आहे. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद शेतीतून होत नव्हती. शिक्षणाच्या खर्चाचा भार पेलवत नसल्याने त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण अर्धवट सोडून यवतमाळ येथून गावी आणले होते. त्यातच मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना भेडसावू लागली. या साऱ्या नैराश्‍यापोटी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी नरेंद्र मोदी सरकार मरणाला जबाबदार असल्याचे नमूद केले होते.  स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, शेतकरी नेते मनीष जाधव, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रावसाहेब अडकीने, नांदेड जिल्हा अध्यक्ष किसन कदम, लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख हरिभाऊ कोंडेकर, अमृतराव देशमुख, वामनराव ढवळे यांनी रविवारी (ता. १५) चायरे कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केले. खासदार राजू शेट्टी यांनी या कुटुंबीयांशी मोबाईलवरून संवाद साधला. लवकरच राजूरवाडीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच या कुटुंबातील तीन मुली व एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com