agriculture news in marathi, swabhimani warns agitaion against crop insurance issue | Agrowon

पीकविम्याची रक्कम न दिल्यास रुमणे मोर्चा : स्वाभिमानी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

नगर ः नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने त्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे. मात्र, २०१७ व २०१८ च्या खरीप फळबाग व पीकविमा मिळाला नाही. सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असून जर तातडीने शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नाही तर जिल्हा बॅंकेवर रुमणे मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

नगर ः नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने त्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे. मात्र, २०१७ व २०१८ च्या खरीप फळबाग व पीकविमा मिळाला नाही. सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असून जर तातडीने शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नाही तर जिल्हा बॅंकेवर रुमणे मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांना मंजूर झालेली विमा रक्कम बॅंक खात्यावर तातडीने वर्ग केलेली आहे. मात्र, जिल्हा सहकारी बॅंकेकडे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा रक्कम भरलेली आहे, त्यांची मंजूर झालेली विमा रक्कम खात्यावर वर्ग झालेली नाही. राष्ट्रीयीकृत बॅंका व सहकारी बॅंका यांनी ऐकाच विमा कंपनीकडे विमा भरलेला असताना राष्ट्रीयीकृत बॅंकांनी व्यवहार पूर्ण केले, मग सहकारी बॅंकेला काय अडचण आहे?

डाळिंब, मोसंबी, संत्रा व पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जर सहकारी बॅंकांनी आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही तर जिल्हा बॅंकेवर रूमणे मोर्चा काढून आंदोलन करू, असे जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद बाबासाहेब मरकड, बाबासाहेब बुधवंत, दत्ता फुंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...