भारनियमनाविरुद्ध ‘स्वाभिमानी’ची कोलरी उपकेंद्रात तोडफोड

भारनियमनाविरुद्ध ‘स्वाभिमानी’ची कोलरी उपकेंद्रात तोडफोड
भारनियमनाविरुद्ध ‘स्वाभिमानी’ची कोलरी उपकेंद्रात तोडफोड

बुलडाणा : भारनियमन वाढल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी (ता. ८) मध्यरात्रीनंतर कोलरी येथील वीज उपकेंद्रात तोडफोड केली. कार्यालयातील सामानाची नासधूस केली अाहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंप्रीगवळी, पिंप्राळा, कोलरी, टेंभुर्णा, अावार या गावशिवारात भारनियमन वाढल्याने नागरिकांसह शेतकरी वैतागले अाहेत.

वारंवार पुरवठा खंडित होत असल्याने शेतातील सिंचन प्रभावित होत अाहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोलरी येथील उपक्रेंद्रावर धडक देत कार्यालयातील सामानाची तोडफोड केली.

...तर ‘स्वाभिमानी’चा टेंभे मोर्चा

वीज कंपनीने भारनियमन बंद न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या खामगाव कार्यालयावर टेंभे मोर्चा काढेल, असा इशारा संघटनेचे श्याम अवथळे यांनी दिला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com