परभणीत प्रतिटन २२०० रुपये ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे उपोषण

परभणीत प्रतिटन २२०० रुपये ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे उपोषण
परभणीत प्रतिटन २२०० रुपये ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे उपोषण

परभणी ः गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने गेल्या वर्षी जाहीर केलेली २ हजार २०० रुपये ऊसदराची रक्कम जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

माखणी (ता. गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने गतवर्षी (२०१७) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस नेत असताना प्रतिटन २ हजार २०० रुपये दर देऊ असे जाहीर केले होते. काही शेतकऱ्यांच्या उसाला सुरवातीला २ हजार रुपये प्रतिटन दर देण्यात आला. तर उर्वरित शेतकऱ्यांना १ हजार ५०० रुपये दर देण्यात आला. शासन निर्णयानुसार १४ दिवसांच्या आत एक रकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. परंतु, या गतवर्षी जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना दर दिलेला नाही.

कारखान्याने शेतकऱ्यांना गतवर्षीचे बिल एफआरपी प्रमाणे द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, डिगांबर पवार, दीपक भालेराव, भास्कर खटींग अन्यायग्रस्त शेतकरी मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com