साताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचा मोर्चा

साताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचा मोर्चा
साताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचा मोर्चा

सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोनहीरा, वर्धन अॅग्रो, सह्याद्री, ग्रीन पॉवर, केन अॅग्रो या कारखान्यांच्या गट कार्यालयांसह सह्याद्री कारखान्यावर स्वाभिमानीचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी मोर्चा काढण्यात आला.

एकरकमी एफआरपी कारखान्यांनी द्यावी, यासाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ओगलेवाडी येथून दुचाकी मोर्चास सुरवात करण्यात आली. ओगलेवाडी येथील सोनहीरा, वर्धन अग्रो या ऑफिससमोर जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी या कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाला कुलूप लावून निघून गेले होते. पुढे हा मोर्चा बनवडा येथील सह्याद्री कारखान्याच्या गट ऑफिस समोर गेला. तिथेही मोठ्या घोषणा देऊन सरकार व कारखानदारांचा निषेध केला. त्यानंतर कोपर्डे हवेलीमार्गे यशवंत नगर येथील सह्याद्री कारखान्याच्या गेटसमोर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र जमून ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांचा धिक्कार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करू म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार, असो अशा घोषणा देण्यात आल्या.

पुढे हा मोर्चा मसूर येथील केन अॅग्रो, ग्रीन पॉवर गोपूज या कारखान्यांच्या गट ऑफिसवर नेण्यात आला. येथेही कर्मचाऱ्यांना बाहेर घेऊन ऑफिस बंद करण्यात आले.

या मोर्चात स्वाभिमानी कराड उत्तर अध्यक्ष शिवाजी पाटील, कृष्णा मदने, सुभाष नलवडे,, योगेश झाम्बरे, सज्जन माने, नागराज शिंदे, प्रसाद धोकटे, अमर कदम, शंकर चव्हाण, बापू शिंदे, मधुकर शिंदे, विनोद जाधव, योगेश डुबल, यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com