सीसीआय केंद्रासाठी 'कापूस गाठोडे' आंदोलन

वरुड, अमरावती ः सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने कापसाचे गाठोडे डोक्‍यावर ठेऊन आंदोलन करण्यात आले.
वरुड, अमरावती ः सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने कापसाचे गाठोडे डोक्‍यावर ठेऊन आंदोलन करण्यात आले.

अमरावती : शासकीय खरेदी केंद्राअभावी व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादकांची लुट होत आहे. ती थांबविण्यासाठी शासनाने तत्काळ सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वरूड येथे सुरू करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता.७) ''कापूस गाठोडे'' आंदोलन करण्यात आले. या वेळी कापसाचे गाठोडे डोक्‍यावर ठेवून आंदोलनकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

वरुड व मोर्शी तालुक्‍यांत कापसाचे मोठे लागवड क्षेत्र असताना या भगात अद्यापही शासनाकडून खरेदी सुरू झाली नाही. परिणामी शेतकरी १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील गावांमध्ये कापूस विक्रीसाठी नेत आहेत.

व्यापारी या संधीचे सोने करीत शेतकऱ्यांकडून कमी भावाने कापसाची खरेदी करून लूट करीत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी तत्काळ सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी स्वाभिमानीने केली. त्यासोबतच गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रती क्‍विंटल बोनस देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

या वेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भुयार, सुमीत गुर्जर, शैलेश ढोबळे, प्रवीण देशमुख, गोपाल ब्राह्मणे, योगेश हरफाळे, आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com