agriculture news in marathi, Swabhimanis Sugarcane conferance will be on 28 oct, Jaishingpur, Kolhapur | Agrowon

स्वाभिमानीची शनिवारी जयसिंगपुरात ऊस परिषद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळावी ऊस परिषद शनिवारी (ता. २८) जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर दुपारी दोन वाजता परिषदेस प्रारंभ होइल. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या हंगामात कोणता दर असावा, याबाबतची मागणी या परिषदेत केली जाईल. यानंतर ऊस आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे. 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळावी ऊस परिषद शनिवारी (ता. २८) जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर दुपारी दोन वाजता परिषदेस प्रारंभ होइल. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या हंगामात कोणता दर असावा, याबाबतची मागणी या परिषदेत केली जाईल. यानंतर ऊस आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही यंदाच्या हंगामात कोणता दर द्यायचा, याबाबची भूमिका ऊस परिषदेनंतर घेण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानीची ऊस परिषद होण्यापूर्वीच पहिला हप्ता ३५०० रुपये मिळावा, या मागणीसाठी इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानीची काय मागणी राहते, याकडे शेतकऱ्यांबरोबर कारखानदारांच्यातही उत्सुकता आहे. 

या परिषदेत श्री. शेट्टी हे साखरदराबरोबर गेल्या वर्षभरात इतर उपपदार्थांची काय स्थिती राहिली, केंद्राचे काय धोरण राहिले, यानुसार किती दर योग्य आहे, याचा तपशीलवार आढावा घेणार आहेत. यंदाच्या हंगामाची रणनीती तेच जाहीर करतील. यंदाची ऊस परिषद त्यांचे एकेकाळची मुलूख मैदान तोफ सदाभाऊ खोत यांच्याविनाच होणार आहे. या तोफेची कमान वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर हे सांभाळणार आहेत. यामुळे सदाभाऊंच्या गच्छंतीनंतर त्यांच्याविषयी परिषदेत काय चर्चा होते, याकडेही ऊस उत्पादकांचे लक्ष असणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत...
रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरतऔरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची...
शेतकऱ्यांची मूग, उडीद खरेदी सुरू...अकोला : नाफेडमार्फत सुरू असलेली मूग, उडीद खरेदीची...
सोलापुरात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नोकर भरतीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक...नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई...नाशिक : राज्यात अवकाळी पाऊस व ओखी वादळामुळे...
‘ऑर्गनाईज कॅपिटल’ आल्यास...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात खासगी क्षेत्राचा हिस्सा...
‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे...नाशिक: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
औषधी गुणधर्माचा सुगंधी, चवदार पोक्कली...दक्षिण भारतातील केरळ हे राज्य वैशिष्ट्यपूर्ण अाहे...
लक्षात घ्या आर्द्रता चक्रउपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी...
कर्बाचे चक्र हा मुख्य कणाकर्ब एका साठ्यातून दुसऱ्या साठ्यात फिरत असतो....
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मातहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी...
दूध का नासले?राज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध...
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ...निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या...
आधार लिंकची मुदत आता ३१ मार्चनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार)...
अंतराळात 'केप्लर-९०आय' हे नवीन सौर मंडळ...नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या...
खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि...
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने...अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी...
कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी...कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह...