agriculture news in marathi, Swabhimani's young wing alerts to stop cane cutting, kolhapur, Maharashtra | Agrowon

ऊसदराचा निर्णय होईपर्यंत तोडी बंद ठेवा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोडी स्वीकारू नयेत, तसेच कर्नाटकातील संबंधित साखर कारखान्यांनी ऊसतोडी बंद ठेवाव्यात, अन्यथा स्वाभिमानी स्टाइलने ऊस तोड व वाहतूक बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीने दिला. 

कोल्हापूर : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोडी स्वीकारू नयेत, तसेच कर्नाटकातील संबंधित साखर कारखान्यांनी ऊसतोडी बंद ठेवाव्यात, अन्यथा स्वाभिमानी स्टाइलने ऊस तोड व वाहतूक बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीने दिला. 

यंदाच्या गाळप हंगामाविषयी आघाडीची कागल येथे बैठक झाली. या बैठकीत हा इशारा देण्यात आला. श्री हालसिद्धनाथ शुगर फॅक्‍टरी (निपाणी), तसेच बेडकीहाळ शुगर फॅक्‍टरी या सीमाभागातील साखर कारखान्यांच्या ऊसतोडी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहेत. गेल्या २०१६-१७ मधील हंगामात कारखानदारांनी अंतिम दर ३३०० रुपयांपेक्षा जादा दिला आहे. चालू हंगामाच्या दराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सीमाभागातील कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस तोडी सुरू केल्या आहेत. ऊस दराचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडी स्वीकारू नयेत, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, राजेंद्र बागल, तानाजी मगदूम, बाबूराव हळदकर, प्रकाश सुळगावे, तानाजी चौगुले, शिवाजी पाटील, संपत पाटील, दादासाहेब पाटील, शिवाजी कळमकर, मधुकर वारके, साताप्पा पाटील, बाळासाहेब नुल्ले, पांडुरंग चौगुले तसेच राहुल खराडे अादी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...