agriculture news in marathi, swach bharat Campaign status in nashik region, maharashtra | Agrowon

नाशिक विभागातील चार जिल्हे हागणदारीमुक्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
नाशिक : नाशिक विभागातील चार जिल्हे हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जळगाव जिल्हा मात्र हागणदारीमुक्त होऊ न शकल्याने नाशिक विभाग संपूर्ण हागणदारीमुक्त होऊ शकला नाही. विभागातील जळगाव जिल्हा वगळता नाशिक, धुळे, नंदुरबार आणि नगर हे चार जिल्हे शंभर टक्के हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत.
 
नाशिक : नाशिक विभागातील चार जिल्हे हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जळगाव जिल्हा मात्र हागणदारीमुक्त होऊ न शकल्याने नाशिक विभाग संपूर्ण हागणदारीमुक्त होऊ शकला नाही. विभागातील जळगाव जिल्हा वगळता नाशिक, धुळे, नंदुरबार आणि नगर हे चार जिल्हे शंभर टक्के हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत.
 
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेंतर्गत २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. शासनाने या योजनेची गेल्या दोन वर्षांपासूनच अंमलबजावणी सुरू केली होती. २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट असले तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र मार्च २०१८ पर्यंतच राज्य हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. 
 
मार्च २०१८ अखेर विभागातील नाशिक जिल्ह्यातील १३६८, नगर जिल्ह्यातील १३११, धुळे जिल्ह्यातील ५४९, नंदुरबार जिल्ह्यातील ४९९, तर जळगाव जिल्ह्यातील १०१७ अशा एकूण ४८७५ पैकी ४७४४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. 
 
विभागातून जळगाव या एकमेव जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. जळगाव जिल्ह्यात अवघ्या ८८.५९ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. विभागात हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी २२११ ग्रामपंचायती मार्च २०१७ अखेर, तर २५३३ ग्रामपंचायती मार्च २०१८ अखेर हागणदारीमुक्त झालेल्या आहेत.
 
विभागात ५ लाख ९४ हजार ८८५ कुटुंबांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेमुळे वैयक्तिक शौचालय सुविधा मिळालेली आहे. मार्च २०१८ अखेर विभागात आता केवळ ८१९ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये उपलब्ध नाहीत. ही सर्व कुटुंबे जळगाव या एकाच जिल्ह्यातील आहेत.
 
हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींची स्थिती
जिल्हा एकूण ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित ग्रामपंचायती टक्के
नगर १३११ १३११ १००
धुळे ५४९ ५४९ १००
जळगाव ११४८ १०१७ ८८.५९
नंदुरबार ४९९ ४९९ १००
नाशिक १३६८ १३६८ १००
एकूण ४८७५ ४७४४ ९७.३१

 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...