स्वच्छ भारताच्या वाटेवर महाराष्ट्र मैलाचा दगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत अभियान

मुंबई  : स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने टाकलेली पावले मैलाचा दगड ठरत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता. १) केले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या नागरी भागाच्या हागणदारी मुक्तीबाबतच्या ‘संकल्पपूर्ती’ कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व शहरी भाग उघड्यावरील हागणदारीमुक्त झाल्याबद्दल राज्याचे अभिनंदन करून राष्ट्रपती पुढे म्हणाले, की २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ भारत होण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान कौतुकास्पद आहे. राज्याने नागरी भाग स्वच्छ केला आहे. यासाठी सर्व नागरी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, राज्याचे अधिकारी कौतुकास पात्र आहेत. राज्याने ३१ मार्च २०१८ पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केल्याचे समजून आनंद वाटला. या माध्यमातून राज्याने महात्मा गांधींजींना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराचे मानकरी पाटण (जि. सातारा) मधील मान्याचीवाडीचे रवींद्र माने (सरपंच) व प्रसाद यादव (ग्रामसेवक), रोहा (रायगड) तालुक्यातील धाटावचे विनोद पशिलकर (सरपंच) व दीपक चिपळूणकर (ग्रामसेवक), अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजारचे पोपटराव पवार (सरपंच) व सचिन थोरात (ग्रामसेवक), अनंतपाळ (लातूर)मधील धामणगाव शिरुळचे धनंजय पाटील (सरपंच) व हुदगे जी.एस. (ग्रामसेवक), मेहकर (बुलडाणा) मधील पांगारखेडच्या अंजली सुर्वे (सरपंच) व मोहन वानखेडे (ग्रामसेवक) आणि लाखणी (जि. भंडारा) येथील शिवणी (मो) च्या माया कुथे (सरपंच) व जयंत गडपायले (ग्रामसेवक) यांचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com