agriculture news in marathi, Swambhimani to go in supreme court for FRP | Agrowon

‘स्वाभिमानी’ एफआरपीबाबत मागणार सर्वोच्च न्यायालयात दाद
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 सप्टेंबर 2018

पुणे : एफआरपीचे निकष ठरवताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची लूट होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. 

पुणे : एफआरपीचे निकष ठरवताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची लूट होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. 

एफआरपीच्या निकषामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४६५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. `स्वाभिमानी`चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ही चूक सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील दुर्लक्ष केले जात आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. उसाच्या एफआरपी निर्धारीत करण्याच्या आधारामध्ये बदल करताना साडेनऊ टक्क्यांचा तळटप्पा दहा टक्के केला आहे. मात्र, यामुळे देशातील शेतकऱ्यांचे साडेचार हजार कोटी तर राज्यातील शेतकऱ्यांना पावणेदोन हजार कोटीचा भूर्दंड बसेल, असे संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी स्पष्ट केले. 

ऊस उताऱ्याचा साडेनऊ टक्के तळटप्पा गृहीत धरून पूर्वी प्रतिटन २५५० रुपये दिले जात होते. त्यानंतर प्रत्येक वाढीव टक्क्याला प्रतिटन २७० रुपयांप्रमाणे ऊस दरात वाढ मिळत होती. मात्र, पुढील गाळप हंगामाकरिता दहा टक्के उतारा हा तळटप्पा ठेवत एफआरपी प्रतिटन २७५० रुपये ठेवली गेली आहे.  

पूर्वीच्या हिशेबाप्रमाणे साडेअकरा टक्के उतारा देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन ३३२८ रुपये मिळाले असते. मात्र, नव्या निकषानुसार याच उताऱ्यासाठी फक्त ३१६२ रुपये मिळतील. तोडणी व वाहतूक खर्चाची कपातदेखील होणार असून डिझेलच्या वाढलेल्या किमती बघता कारखाने ही कपात अजून वाढवतील, असे `स्वाभिमानी`चे म्हणणे आहे. 

आगामी गाळप हंगामात राज्यात ९०० लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना दहा टक्के उताऱ्याच्या निकषामुळे प्रतिटन १६५ रुटका फटका बसणार असल्याने आम्ही या निकषाला सर्वोच्च न्यायलयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. पांडे यांनी म्हटले आहे. 

गेल्या हंगामातील आधारभूत किमतीत केंद्र सरकारने प्रतिटन दोनशे रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्याचवेळी उताऱ्याचा तळटप्पा अर्ध्या टक्क्याने वाढवून शेतकऱ्यांना एका हाताने दिलेली वाढ दुसऱ्या हाताने काढून घेण्यात आली आहे 
-  योगेश पांडे, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
 

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...