Agriculture news in Marathi, sweet lemon producers in trouble due to fruit drops, Maharashtra | Agrowon

मोसंबी उत्पादक फळगळीने मेटाकुटीला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

किमान महिनाभरानं मोसंबीची काढणी केली असती, पण कच्चीच फळं गळत असल्यानं काढणीचा, विक्रीचा निर्णय घेतला. किमान १० ते १५ टन मोसंबी गळाली असावी. काढणी केलेल्या ३५ टनालाही केवळ १४ हजार रुपये प्रतिटनाचा फटका बसलाच. 
- रामेश्वर दौंड, पारुंडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वांत महत्त्वाचे फळपीक म्हणून मोसंबीची ओळख; परंतु या मोसंबीच्या कच्च्या फळांची प्रचंड प्रमाणात होत असलेली फळगळ उत्पादकांना तोट्यात ढकलत आहे. शिवाय दरातही झालेली घसरण शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी ठरली असून, उपाय करूनही फळगळ का होत आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून तज्ज्ञ याविषयी मार्गदर्शन करतील का, असा प्रश्न मोसंबी उत्पादक उपस्थित करीत आहेत. 

यंदाच्या आंबे बहरातील मोसंबीवर फळगळीचे संकट घोंगावते आहे. सुरवातीला ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली ही फळगळ आता काही बागांमध्ये ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत गेली आहे. मराठवाड्यातील मोसंबीच्या ४६ हजार ५२२ हेक्‍टरवर विस्तारलेल्या क्षेत्रात औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतच सर्वाधिक क्षेत्र आहे.

यंदा मोसंबीचा आंबे बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोसंबीत फळगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पैठण तालुक्‍यातील रहागाव, पाचलगाव, वाहेगाव, कातपूर, नारायणगाव, मुधळवाडी आदी गावांतील मोसंबी बागांमध्ये गळीचे प्रमाण प्रचंड असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. डोळ्यांदेखत बागेचे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले आहे. 

शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलेली स्थिती...
काही शेतकऱ्यांच्या पाहणीनुसार लिंबासारख फळ झालं की देठ कुजायला सुरवात होते. पाठीमाग देठ फुगतं, फुगून फळ गळ होते. त्याला काळ्या रंगाचा चट्टा पडतो. तोडायला आलेली फळे गळत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या बागांत हिरवं असलेलं मोसंबीचं देठ वाळून जात आहे.  

तज्ज्ञांनी पाहणी करण्याची गरज
प्रत्येक वर्षी होणाऱ्या फळगळीने यंदा मर्यादा ओलांडल्याचे शेतकरी सांगताहेत. त्यामुळे ही गळ का होते आहे, याची पाहणी करून किमान पुढील बहरात हा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तज्ज्ञांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना शेतकऱ्यांना सुचविणे गरजेचे आहे. 

प्रतिक्रिया
मागच्या वर्षी पाच दहा टक्‍क्‍यांपर्यंत असलेली फळगळ यंदा चार एकरांतील मोसंबीत जवळपास ५० टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे. बागेला पाण्याची कमतरता नाही. सुचविलेले, माहिती असलेले सर्व उपाय करूनही फळगळ थांबण्याचे नाव नाही. दरही पाडून मागीतल्या जात असल्याने नुकसानीत भर पडते आहे. तज्ज्ञांनी पाहणी करूनच उपाय सुचवायला हवं, 
- प्रल्हादराव गलधर, रहाटगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

गळ का होते तेच कळेना. तज्ज्ञांनी उपाय सुचवायला हवे. माझ्या बागेत ४० ते ५० टक्‍के फळगळ झालीय. 
- महादेव तारगे, मोसंबी उत्पादक, घनसावंगी 

हार्वेस्टिंगला येण्याआधीच फळांची गळ होते आहे. दहा एकर मोसंबीपैकी चार एकरांतील फळगळ ५० टक्‍क्‍यांच्या पुढे आहे. 
- बद्रिनाथ पाचोडे, दिनायतपूर, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...