agriculture news in marathi, Sweet potato arrivals in Pune APMC | Agrowon

पुणे बाजार समितीत रताळे, कवठांची विक्रमी आवक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे :  मंगळवारी (ता. १३) साजऱ्या हाेणाऱ्या मशिवरात्रीनिमित्त विशेष मागणी असलेल्या कवठ आणि रताळ्यांची पुणे बाजार समितीमध्ये माेठ्या प्रमाणावर आवक झाली हाेती. रविवारी (ता. ११) रताळ्याताची विक्रमी सुमारे ७० ट्रक आवक झाली हाेती. या वेळी रताळ्याला प्रतिकिलाेला १० ते २० रुपये दर मिळाला हाेता. तर कवठांचीदेखील गेल्या तीन दिवसांपासून माेठी आवक झाली हाेती.  नगर, पुरंदर आणि साेलापूर भागांतून कवठांची सुमारे तीन हजार गाेणी आवक झाली हाेती. कवठांना शेकड्याला १०० ते ६०० रुपये दर हाेता.

पुणे :  मंगळवारी (ता. १३) साजऱ्या हाेणाऱ्या मशिवरात्रीनिमित्त विशेष मागणी असलेल्या कवठ आणि रताळ्यांची पुणे बाजार समितीमध्ये माेठ्या प्रमाणावर आवक झाली हाेती. रविवारी (ता. ११) रताळ्याताची विक्रमी सुमारे ७० ट्रक आवक झाली हाेती. या वेळी रताळ्याला प्रतिकिलाेला १० ते २० रुपये दर मिळाला हाेता. तर कवठांचीदेखील गेल्या तीन दिवसांपासून माेठी आवक झाली हाेती.  नगर, पुरंदर आणि साेलापूर भागांतून कवठांची सुमारे तीन हजार गाेणी आवक झाली हाेती. कवठांना शेकड्याला १०० ते ६०० रुपये दर हाेता.

रताळ्यांच्या आवकेमध्ये कर्नाटक, बीड, कराड या भागांतून सुमारे ६० ते ७० ट्रक आवक झाली. या आवकेमध्ये कर्नाटकातून सुमारे ३० ट्रक, तर बीड व कराड येथून ३० ट्रक आवक झाली. कर्नाटकातील रताळी हलक्या प्रतीची आणि चवीला तुरट असल्याने या राताळ्यांना १० किलोसाठी ८० ते ११० रुपये दर मिळाला. तर बीड परिसरातील रताळी चवीला गाेड असल्याने या राताळ्यास १४० ते १६० रुपये दर मिळाला. कराड येथून आलेली रताळी चांगल्या दर्जाची असल्याने या राताळ्यांना १८० ते २०० रुपये भाव मिळाला.

रताळ्यांच्या आवके बाबत बाेलताना शेतकरी चंद्रकांत महादेश सस्ते (रा. मलकाची वाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) म्हणाले, ‘‘आमची २ एकर रताळी असून, यंदा परिसरातील मिळून २५० गाेणी रताळी विक्रीसाठी आणली हाेती. या वेळी प्रतिकिलाेला ५ ते ६ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर कमी मिळाला. गेल्या वर्षी १५० गाेणी विक्रीसाठी आणली हाेती. त्या वेळी १२ रुपये प्रतिकिलाेला दर मिळाला हाेता. यंदा मालाला उठाव नसल्याने आणखी ७०-८० पाेत्यांची विक्री शिल्लक आहे. आज संध्याकाळपर्यंत विक्री झाली तर ठीक, नाहीतर फेकून द्यावी लागतील.’’ 

कवठांची विक्री करणारे शेतकरी सचिन अवसरलमल (रा. पाथर्डी, जि. नगर) म्हणाले, ‘‘आमची स्वतःची चार झाडे असून, ५ झाडे ९०० रुपयांनी विकत घेतली हाेती. या सर्व झाडांचे मिळून ३० गाेणी कवठे विक्रीसाठी आणली हाेती. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...