agriculture news in marathi, sweet potato price at kolhapur market committee | Agrowon

कोल्हापुरात रताळी ७० ते २०० रुपये दहा किलो
राजकुमार चौगुले
बुधवार, 27 सप्टेंबर 2017
कोल्हापूर  : येथील बाजार समितीत नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतून रताळ्याची आवक वाढली आहे. रताळ्याची गेल्या चार दिवसांत दररोज एक ते दीड हजार पोती इतकी आवक होत आहे. रताळ्यास ७० ते २०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत रताळ्याचे दर सुमारे पंचवीस टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत रताळ्याची नियमित आवक ३०० ते ४०० पोती इतकी होत असते. 
 
कोल्हापूर  : येथील बाजार समितीत नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतून रताळ्याची आवक वाढली आहे. रताळ्याची गेल्या चार दिवसांत दररोज एक ते दीड हजार पोती इतकी आवक होत आहे. रताळ्यास ७० ते २०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत रताळ्याचे दर सुमारे पंचवीस टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत रताळ्याची नियमित आवक ३०० ते ४०० पोती इतकी होत असते. 
 
नवरात्रोत्सवानिमित्त रताळी मागणीत वाढ होत असल्याने शेतकरी काढणीचे नियोजन करतात. शाहूवाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील पेरीड, कडवे, निनाई परळे, आळतूर, निळे, करुंगळे, भोसलेवाडी, शाहूवाडी, चनवाड, वाळूर, कासार्डे या परिसरांतील शेतकरी रताळी पीक घेताना दिसतात. नवरात्रोत्सवात रताळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते.
 
कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, पुणे, कर्नाटक, वाशी, गुजरात, आदी बाजारपेठांत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असतात. याशिवाय पुणे-बेंगळूर महामार्गावरील वाळवा तालुक्‍यातील येलूर व परिसरांतील गावांतही रताळी पीक घेतले जाते.
खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड केली जाते. रेताड मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. यंदा सुरवातीला पावसाने अडचण वाढविली असली, तरी रताळी काढणीच्या पक्वतेच्या काळात चांगला पाऊस झाल्याने त्यांची वाढ चांगली झाली. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नाची स्थिती चांगली राहिल्याचे उत्पादकांनी सांगितले.
 
नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे, मुंबईच्या बाजारपेठांत या भागातील रताळ्यांना मागणी असते. यंदा मुंबई, पुण्याच्या बाजारपेठांतही दहा किलोस ३०० रुपयांपर्यंत दर मिळाले. सध्या कोल्हापूर बाजार समितीत नियमित आवक सुरू आहे. मागणी असल्याने दर स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...