agriculture news in marathi, Takaari' scheme water starts from canals | Agrowon

'ताकारी' योजनेचे पाणी कालव्यातून लागले वाहू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

सांगली : कडेगावसह खानापूर आणि तासगाव तालुक्‍याला सुजलाम-सुफलाम करणारी ताकारी उपसा जलसिंचन योजना गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताकारी सिंचन योजनेचे पाणी राजकीय श्रेयवादात तीन महिने अडकले होते. लाभक्षेत्रातील सर्वच पिकांची अक्षरशः होरपळ झाली. प्रमुख पीक असलेले ऊसक्षेत्र वाळून चिपाडे झाली. विविध संघटनांनी आंदोलने केली. तरीही पाटबंधारे विभागाने पाणी सोडले नाही. या योजनेची एकूण १० कोटी ३७ लाख वीजबिल थकबाकीपैकी निम्मे भरल्याशिवाय वीज न जोडण्याची भूमिका महावितरणची होती.

सांगली : कडेगावसह खानापूर आणि तासगाव तालुक्‍याला सुजलाम-सुफलाम करणारी ताकारी उपसा जलसिंचन योजना गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताकारी सिंचन योजनेचे पाणी राजकीय श्रेयवादात तीन महिने अडकले होते. लाभक्षेत्रातील सर्वच पिकांची अक्षरशः होरपळ झाली. प्रमुख पीक असलेले ऊसक्षेत्र वाळून चिपाडे झाली. विविध संघटनांनी आंदोलने केली. तरीही पाटबंधारे विभागाने पाणी सोडले नाही. या योजनेची एकूण १० कोटी ३७ लाख वीजबिल थकबाकीपैकी निम्मे भरल्याशिवाय वीज न जोडण्याची भूमिका महावितरणची होती.

शासनाने टंचाईनिधीचे ४ कोटी ७१ लाख अडविले होते. शिवाय काही साखर कारखानदारांनी गतवर्षी शेतकऱ्यांची कपात केलेली पाणीपट्टीची दीड कोटीची रक्कम पाटबंधारेला दिलीच नव्हती. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम यांची बैठक झाली.

या बैठकीत भागातील ५ साखर कारखान्यांनी ५ कोटी भरून योजना सुरू करण्याचे ठरले. त्यानुसार रक्कम जमा करून महावितरणला भरली. यानंतर महावितरणने उरलेल्या ५ कोटीबद्दल प्रश्न निर्माण केला. त्यावर पाटबंधारेही हतबल झाले. त्यासाठी मुंबईत मंत्रालयात महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला. त्यानुसार महावितरणच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तीन दिवसापूर्वी दुपारी आदेश आल्यानंतर वाजता वीज जोडणी झाली.

टप्पा १ साटपेवाडी बंधाऱ्यातून दोन पंपाद्वारे पाणी उचलून टप्पा २ सागरेश्वर संतुलन जलाशयात पाणी सोडले गेले. कृष्णा नदीत कोयना धरणातून २ हजार क्‍यूसेक प्रतीसेकंद प्रमाणे पाणी सोडण्यात आले असून ते साटपेवाडी बंधाऱ्यात पोहोचले आहे. ताकारीच्या पाण्याने देवराष्ट्रे ओलांडून ७ कि.मी.वरील मोहित्यांचे वडगाव परिसरात प्रवेश केला आहे. टप्पा २ वरील आणखी दोन पंप सुरू केले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाची गती वाढली आहे. पाण्यामुळे वाळलेले ऊस क्षेत्र जीवंत होणार नसले तरी काही प्रमाणात रब्बी पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी निश्‍चित लाभ होणार आहे.

ताकारी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. सोडण्यात आलेले पाणी गरज असलेल्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत बंद केले जाणार नाही.
- प्रकाश पाटील,
कार्यकारी अभियंता ताकारी सिंचन योजना.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...