ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लक

ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लक
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लक

वांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी दिवाळीनंतर ताकारी योजनेचे पाणी आवर्तन सुरू होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा परिसर सक्षम झाला आहे. ताकारीचे पाणी कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्‍यांतून ११६ किलोमीटर प्रवास करून एकंदरीत १४ हजार ५०० हेक्‍टर लाभक्षेत्र भिजवले जात आहे. येथील कारखान्यांचे सहकार्य व ८१-१९ फॉर्म्युला लागू झाल्याने योजनेच्या तिजोरीत पहिल्यांदाच १३ कोटी शिल्लक राहणार आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात कडेगाव, तासगाव, खानापूर, पलूस हे चार तालुके आहेत. ताकारीची सध्या ९ कोटी ४१ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. शासनाने सिंचन योजनांसाठी १ एप्रिल २०१८ पासून ८१-१९ फॉर्म्युला लागू केला आहे. यानुसार सिंचन योजनांचे ८१ टक्के प्रमाणे ७ कोटी ६२ लाख रुपये इतके वीजबिल शासनाच्या जलसंपदा विभागाने तर १९ टक्के प्रमाणे १ कोटी ७८ लाख रुपये इतके वीजबिल व पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरायची आहे. योजनेकडे सध्या २ कोटी रुपये शिल्लक आहेत. 

याशिवाय मागील वर्षी टंचाईतून दिलेल्या आवर्तनाचे २ कोटी २५ लाख, तर चालू वर्षी टंचाई निवारणासाठी वापरलेल्या पाण्याचे १ कोटी शासनाकडून येणे आहे. याशिवाय मागील वर्षाची ऊसबिलातून वसूल झालेली १ कोटी २५ लाख तर चालू वर्षी वसूल होणारी ७ कोटी अशी शेतकऱ्यांच्या हिश्‍शाची ८ कोटी २५ लाख इतकी रक्कम कारखान्यांकडून योजनेकडे एकंदरीत १४ कोटी ७५ लाख रुपये जमा होणार आहेत. त्यापैकी फक्त १ कोटी ७८ लाख रुपये शेतकऱ्यांचे वीजबिल भरावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com