ताकारीतून लाभक्षेत्रात सोडले पाणी

ताकारीतून लाभक्षेत्रात सोडले पाणी
ताकारीतून लाभक्षेत्रात सोडले पाणी

वांगी, जि. सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात यंदा मान्सूनमध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने अतिशय दाहक परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिके होरपळली आहेत. पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष जाणवू लागल्यानंतर लोकांतून ताकारी पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी होत होती. यास अनुसरून सोमवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून टप्पा २ वरील पंपाद्वारे पाणी मुख्य कालव्यात सोडले ते मंगळवारी दुपारी वांगीत कि.मी.२० वर पोचले.

शेतकऱ्यांची अवस्था पाहता पाटबंधारेने हालचाली करून शासनाने वीज थकबाकीसाठी ३ कोटी २५ लाख भरल्यावर दहा दिवसांपूर्वी वीजजोडणी झाली. त्यानंतर तांत्रिक कामे उरकून सोमवारी (ता. २४) दुपारी ३ वाजता टप्पा १ कृष्णा नदीवरील साटपेवाडी बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झाल्यावर ३ पंप सुरू करून हे पाणी सागरेश्वर येथे टप्पा २ वर संतुलन जलाशयात सोडले. या ठिकाणी रात्री १ वाजता आवश्यक पाणीपातळी येताच ३ पंप सुरू करून पाणी मुख्य कालव्यात सुरू झाले.

त्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजता दोन्ही टप्प्यावरील एकूण ६ पंप सुरू केले आहेत. सदरचे पाणी दुपारी २ वाजता वांगीत पोचले. वांगीत २० व्या कि.मी.वरील गेट बंद करून हे पाणी सुरवातीला कुंभारगाव ते वांगी या ० ते २० कालव्याच्या सर्व वितरिकांतून सोडण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ उर्वरित खरीप पिकांसह बारमाही बागायती क्षेत्राला आणि सिंचनक्षेत्रातील कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील गावांना पिण्याचे पाण्यासाठी होणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही अत्यंत आनंदीत झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com