Agriculture news in marathi, Takari project, water bill rate Increase | Agrowon

ताकारी सिंचन योजनेच्या पाणीपट्टीत वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 डिसेंबर 2017
मुळात ताकारी सिंचन योजनेची पाणीपट्टी पहिल्यापासून जास्त होती; पण आता पाणीपट्टी वाढवून पाटबंधारे विभागने मोठी चूक केली आहे. वाढीव पाणीपट्टीमुळे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीपट्टीच्या विरोधात उपोषण करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. 
- मधुकर बाळू चव्हाण, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.
सांगली  ः ताकारी सिंचन योजनेच्या पाणीपट्टीत यंदापासून वाढ करण्यात आली आहे. उसासाठी एकरी तब्बल २०३२ रुपये इतकी वाढ झाली आहे. फळबागेसाठी पाणीपट्टी ९८२ रुपयांनी वाढली आहे. या पाणीपट्टीवाढीचे कारण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.
 
त्यामुळे या सिंचन योजनेच्या नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीची केलेली वाढ चुकीची आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. 
 
ताकारी सिंचन योजना ही जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील एक गाव आणि कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्‍यांत विस्तारलेली आहे. या तालुक्‍यांतील एकूण क्षेत्र १३ हजार ६१८ हेक्‍टर आहे. त्यापैकी केवळ ९ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.
 
यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे. अनेक शेतकरी या योजनेची पाणीपट्टी वेळेत भरतात. त्याचप्रमाणे कारखान्याच्या माध्यमातूनही पाणीपट्टी भरली जाते; मात्र ताकारी उपसा सिंचन योजनेचे वेळत पाणी मिळत नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
 
मुळातच ताकारी सिंचन योजनेची पाणीपट्टी अधिक आहे. त्यामुळे त्याची जुळवाजुळव करताना कठीण जाते. त्यातच पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी वाढविण्याची घोषणा केली आहे. वाढीव पाणीपट्टीनुसार पाणीपट्टीवसुलीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. अगोदर या योजनेचे पाण्याचे आवर्तन सुरळीत करा, अशी मागणी होऊ लागली आहे.
 
पाणी जरी वेळेत मिळाले तरी वाढीव पाणीपट्टी देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. पाटबंधारे विभागाने केलेली पाणीपट्टीवाढ शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे चित्र आहे. 
 
 
 

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...