agriculture news in marathi, Take action against bank not distributing crop loan - source | Agrowon

पीककर्जाचे वाटप न करणाऱ्या बॅंकेवर कारवाई करा : खोत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

सांगली ः खरीप हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून पीककर्जाचे वाटप न करणाऱ्या बॅंकेवर कडक कारवाई करण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना शुक्रवारी (ता. १५) दिल्या.
सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या खरीप हंगाम बैठकीत मंत्री खोत बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, आमदार विलासराव जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सांगली ः खरीप हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून पीककर्जाचे वाटप न करणाऱ्या बॅंकेवर कडक कारवाई करण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना शुक्रवारी (ता. १५) दिल्या.
सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या खरीप हंगाम बैठकीत मंत्री खोत बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, आमदार विलासराव जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सध्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना २१०० कोटी रुपये कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बॅंकेकडून ५० टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. मात्र, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बॅंक, आयडीबीआय आणि आयसीसीआय या बॅंकेडून कर्जपुरवठा होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, की खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पाठपुरावा करा. त्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जपुरवठा करण्यासाठी नियोजन करा. कर्जवापट करताना प्रत्येक तालुक्‍यात आठवड्यातून दोन दिवस वेगळे काउंटर सुरू करा. कर्जासाठी आल्यानंतर त्याच ठिकाणी तातडीने कर्जपुरवठा करणे सोपे जाईल. गेल्या वर्षी खरीप हंगामात कर्जपुरवठा कमी झाला होता. यंदाच्या हंगामात कर्जपुरवठा करण्यासाठी कृषी विभागानेदेखील पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.

खरीप कर्जपुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यातील सर्वच बॅंकांची एक बैठक घेतली आहे. त्या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरी बैठक मंगळवारी (ता. १९) आणि तिसरी बैठक सोमवारी (ता. २५) घेतली जाणार आहे. त्यामध्ये बॅंकेने किती टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे, याचा आढाव घेतला जाणार आहे. ज्या बॅंकेनी कर्जपुरवठा केला नाही, अशा बॅंकेची तक्रार आरबीआयकडे केली जाणार आहे, शासनाने पेरणी हंगाम संवाद सुरू केला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्‍यात पेरणी करण्यासाठी मी येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाची यादी माझ्याकडे द्या, असे मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त पदे लवकरच भरू
ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायक आणि मंडल अधिकारी यांच्या नावाचे भेटीचे वार असलेले फलक लावा
द्राक्षाला बारमाही विम्याचा प्रस्ताव द्या

कर्जवाटपाची बॅंकनिहाय अाकडेवारी
जिल्हा मध्यवर्ती बॅंक ः ५० टक्के
बॅंक ऑफ इंडिया ः २१ टक्के
* बॅंक ऑफ महाराष्ट्र ः १८ टक्के
सेंट्रल बॅंक ः ५ टक्के
आयडीबीआय ः ३२ टक्के
आयसीसीआय  ः ११ टक्के

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...