agriculture news in marathi, Take action against officer who had can not done bananas report | Agrowon

केळीचे पंचनामे न करणाऱ्यांवर कारवाई करा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव : वादळ व गारपिटीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी क्षेत्राचे पंचनामे न करणाऱ्या दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, शेतकऱ्यांनी न्यायालयात खटले दाखल करावेत, असे आदेश बुधवारी (ता. १) जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शेतकरी, विमा कंपनी व कृषी विभागासोबत झालेल्या बैठकीत दिले.

जळगाव : वादळ व गारपिटीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी क्षेत्राचे पंचनामे न करणाऱ्या दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, शेतकऱ्यांनी न्यायालयात खटले दाखल करावेत, असे आदेश बुधवारी (ता. १) जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शेतकरी, विमा कंपनी व कृषी विभागासोबत झालेल्या बैठकीत दिले.

बैठकीत शेतकरी विशाल महाजन, महेश महाजन, सत्त्वशील पाटील, विमासंबंधी नियुक्त केलेल्या एचडीएफसी एर्गो कंपनीचे जिल्हा समन्वयक महेश पवार, अग्रणी बॅंक, जिल्हा बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.

विमाधारक केळी उत्पादकांनी त्वरित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर नुकसानीबाबत संपर्क साधला. ई-मेल, फॅक्‍सदेखील केले. ३१ जुलै रोजी विमा सुरक्षा कालवधी संपला. तरीही सुमारे एक हजारांवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास विमाकंपनी जबाबदार राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

विमा कंपनीने केळी विमाधारकांची माहिती शासनाच्या पोर्टलवर टाकलेली नाही. अजून ५ हजार ५०० विमाधारकांची माहितीच या पोर्टलवर बॅंकांनी भरली नाही. बॅंकांच्या चुकांमुळे पंचनामे रखडले आहेत, असा दावा विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन खटले भरावेत व दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू करावी, असे आदेश दिले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...