agriculture news in marathi, Take action on the defaulters: MP Shetty | Agrowon

थकबाकीदारांवर कारवाई करा : खासदार शेट्टी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही सर्वसामान्यांची आहे. ती वाचली पाहिजे. त्यासाठी थकीत कर्जवसुलीसाठी कागदी घोडे न नाचविता संबंधितांवर थेट कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही सर्वसामान्यांची आहे. ती वाचली पाहिजे. त्यासाठी थकीत कर्जवसुलीसाठी कागदी घोडे न नाचविता संबंधितांवर थेट कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.

सरकोली, ता. पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी उपसभापती विष्णू बागल, समाधान फाटे, महामूद पटेल, शिवाजी पाटील, विजय रणदिवे, तानाजी बागल, सचिन पाटील, राहुल घुले, नवनाथ माने, किर्तीकुमार गायकवाड, अमर इंगळे, विश्रांती भुसनर, निवास भोसले आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार एफआरपीनुसार दर द्यावा लागत असल्याने साखर उतारा कमी दाखवित आहेत. त्याचा फटका सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांकडे एफआरपीची कोटी रुपयांची रक्कम थकीत असून, ती मिळविण्यासाठी संघर्ष तीव्र केला जाईल.

दूधदराच्या घसरणीच्या प्रश्नाला केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांना दीड वर्षापूर्वी भेटून दूधदराचा प्रश्न मांडला होता. त्यांनी तो गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्याला थेट अनुदान द्यावे. दूधदरासाठी यापुढील काळात आरपारची लढाई उभी केली जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.

 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेणाऱ्या कारखानदारांविरोधात आक्रमक राहणार आहोत. भीमा नदीच्या पाण्यासाठी संघर्ष निश्‍चित आहे. पोलिस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मुलांवर दंडुके उचलू नयेत. मुजोरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची धमक शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये आहे, असे तुपकर यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...