agriculture news in marathi, Take the Agricultural Diploma in Agriculture | Agrowon

नोकरीसाठीच नव्हे, तर शेतीसाठी कृषी पदविका घ्या : कुलगुरू डॉ. भाले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

बुलडाणा : सध्या प्रत्येकाला नोकरी हवी आहे. किंबहुना शिक्षणाचे मुख्य ध्येयच नोकरी पुरते सीमित होताना दिसत आहे. त्याचे परिणाम आपणा सर्वांसमोर आहेत. बदलत्या जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कौशल्यप्राप्ती अत्यावश्यक असून केवळ नोकरीसाठी नव्हे तर शेती, स्वयंरोजगारासाठी कृषी पदविका घ्या, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

बुलडाणा : सध्या प्रत्येकाला नोकरी हवी आहे. किंबहुना शिक्षणाचे मुख्य ध्येयच नोकरी पुरते सीमित होताना दिसत आहे. त्याचे परिणाम आपणा सर्वांसमोर आहेत. बदलत्या जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कौशल्यप्राप्ती अत्यावश्यक असून केवळ नोकरीसाठी नव्हे तर शेती, स्वयंरोजगारासाठी कृषी पदविका घ्या, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

बुलडाणा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी हितगूज कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बुलडाणा येथे प्रथमच एका शासकीय कार्यासाठी आले असताना डॉ. भाले यांनी शहरातील कृषितंत्र विद्यालयाच्या प्रांगणात स्वागत तथा पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी हितगूज केले.  प्राचार्य डॉ. सतीशचंद्र जाधव यांनी हे आयोजन केले होते.

या वेळी डॉ. भाले म्हणाले, की शेतीला आता सक्षम जोडीदाराची नितांत आवश्यकता अाहे. पारंपरिक शेतीला नव तंत्रज्ञानाची जोड देत उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर झाला पाहिजे. कृषी शिक्षणाचा नोकरीसाठी नव्हे तर स्वयंरोजगार निर्मितीसाठी उपयोग करून स्वतः तर यशस्वी व्हाच, सोबत इतरांसाठी रोजगार निर्मिती करीत स्वयंपूर्ण व्हा.

शहरांची दैनंदिन गरज ओळखत दूध, दुग्ध पदार्थ, अंडी, भाजीपाला, फूले, फळे, आदी नगदी पैसा कमावून देणारे कृषी पूरक व्यवसाय तांत्रिक व कौशल्यपूर्ण ज्ञान वापरून करा म्हणजे तुम्हाला पैसा तर मिळेलच शिवाय शहरवासीयांना शुद्ध, ताजा, सकस आहार सहज उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

या भेटीप्रसंगी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. चंद्रकांत जायभाये, विद्यापीठाचे माहिती तथा जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांच्यासह कृषी अधिष्ठाता कार्यालयाचे प्रा. प्रशांत पडघन यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी डॉ. भाले यांनी प्रत्येकी १० विद्यार्थ्यांचा गट स्थापून त्यांना स्पर्धात्मक तत्त्वावर त्याचे आवडीनुसार परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी व शास्त्रशुद्ध पद्धतीने विविध नगदी पिके, भाजीपाला, फुले आदी लागवडीसह दूग्ध पदार्थ, गांडूळ खत, रोपवाटिका निर्मिती करीत व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देत उत्पादनावर आधारित लाभांश द्यावा, असे निर्देश प्राचार्य डॉ. जाधव यांना दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सतीशचंद्र जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. निशिगंधा मैरान यांनी तर आभार प्रा. प्रेमनाथ मोरे यांनी मानले.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप...राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा...
जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा...देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, ...
निर्यातक्षम मोसंबीसाठी एकच बहर घ्यावा...जालना :  निर्यातक्षम मोसंबी उत्पादनासाठी...
सुबोध सावजींचा विहिरीतच मुक्कामअकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या...
साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा...लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना...
जागेवरच कुजवा सेंद्रिय घटकमी १९७० मध्ये कोल्हापूरमध्ये शेती करण्यास प्रारंभ...
धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा...बारामती, जि. पुणे : देशातील धोरणकर्त्यांना शेतमाल...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...
मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवारबीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलनअकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील...
शासकीय निधी खर्चाची माहिती आता एका क्‍...रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा...
जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...