agriculture news in marathi, take benefit of crop insurance scheme : Shinghal | Agrowon

शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा ः जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे, या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे, या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत जे शेतकरी महसूल विभागाकडील नोंदणीकृत खातेदार आहेत. म्हणजेच ज्यांची नावे सातबारा उताऱ्यावर आहेत. अशाच शेतकऱ्यांसाठी ही योजना कार्यन्वित करण्यात आली आहे. तसेच १८ ते ७० वयोगट असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना २०१५ पासून केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत वयोगट पात्रतेतील सर्व व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या योजनेतून फक्त अपघाती मृत्यू व अपघातामुळे आलेले अपंगत्व या बाबीस संरक्षण देण्यात आले आहे.

अपघातादिवशी विमा धारकाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी व ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज बॅंकेकडे सादर करावा लागेल. विमाधारकाचे कोणत्याही राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खाते असणे आवश्‍यक (जनधन योजनेचे खाते नसावे) आहे. या योजनेत विमा संरक्षण १ जून ते ३१ मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल. यासाठी विमाधारकाने आपले ज्या बॅंकेत खाते आहे, त्या बॅंकेत योजना कालावधीत केव्हाही जाऊन आपला विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. विमाधारकाचा रक्कम १२ रुपये विमा हप्ता त्याचे बॅंक खात्यातून परस्पर वजा होईल. तसेच या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...