agriculture news in marathi, Take care to avoid the loss of groundnut | Agrowon

भुईमुगाचे नुकसान टाळण्यासाठी घ्या काळजी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

अकोला : उन्हाळी पीक म्हणून वऱ्हाडात बऱ्यापैकी लागवड क्षेत्र असलेल्या भुईमुगाचे गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भुईमुगाची अतोनात वाढ, शेंगा न लागणे, लागलेल्या शेंगा वजनाने हलक्या राहणे, अशा असंख्य तक्रारी तीनही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात अाल्या होत्या. या हंगामात भुईमुगाची लागवड करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतल्यास नुकसान टळू शकते, असे तज्ज्ञांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले.

अकोला : उन्हाळी पीक म्हणून वऱ्हाडात बऱ्यापैकी लागवड क्षेत्र असलेल्या भुईमुगाचे गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भुईमुगाची अतोनात वाढ, शेंगा न लागणे, लागलेल्या शेंगा वजनाने हलक्या राहणे, अशा असंख्य तक्रारी तीनही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात अाल्या होत्या. या हंगामात भुईमुगाची लागवड करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतल्यास नुकसान टळू शकते, असे तज्ज्ञांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले.

अकोला जिल्ह्यात पातूर, अकोट, तेल्हारा, बुलडाणा जिल्ह्यांत मेहकर, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच वाशीम जिल्ह्यात काही भागांत भुईमुगाची लागवड केली जाते. जानेवारीत भुईमूग लागवडीला सुरवात होते.

सध्या या पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली अाहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने भूजलपातळी घटली, तसेच प्रकल्पही कोरडे आहेत. यामुळे क्षेत्रघटीची अाधीच शक्यता अाहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता अाहे, असे शेतकरी लागवडीच्या तयारीला लागले अाहेत. गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी थोडे सावध झाले अाहेत.

लागवडीस विलंब नको
उन्हाळी भुईमुगाची जानेवारीत लागवड सुरू होते. काही शेतकरी फेब्रुवारीतही लागवड करतात. मात्र उशिरा लागवड केल्यास  पाण्याचा फटका बसतो. शिवाय पिकाचा कालावधी लांबतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जानेवारीअखेरपर्यंतच किंवा जास्तीत जास्त फेब्रुवारीच्या पहिल्या अाठवड्यानंतर पेरणी करू नये. पेरणी करताना गादीवाफा व रुंद वरंबा सरी किंवा सपाट वाफ्यावर पेरणी करणे सोयीचे राहील. पाणी व खत व्यवस्थापन वेळेत करायला हवे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत कॅल्शिअम या अन्नघटकाच्या पूर्ततेसाठी पिकाला जीप्सम द्यावे. एप्रिल-मेमध्ये पाण्याचा खंड पडू देऊ नये. असे न झाल्यास शेंगा लागणे, पोचट शेंगांचे प्रमाण वाढणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. गेल्या हंगामात यामुळेच शेकडो हेक्टरवरील भुईमुगाचे नुकसान झाले होते.

भुईमुगाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी पिकाला योग्य पाणी, शिफारशीत खतमात्रा, जिप्समचा वापर, तसेच लागवडीपूर्वी बियाण्यास प्रक्रिया करूनच लागवड करावी. लागवड शक्यतोवर जानेवारीत होईल यादृष्टीने नियोजन करावे.
- डॉ. एम.वाय. लाडोळे, सहायक प्राध्यापक
तेलबिया संशोधन विभाग, ‘पंदेकृवि’ अकोला.

 

 

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...