agriculture news in marathi, Take Crop loan application discussions urgently, Jalgaon District Collector | Agrowon

पीक कर्जाच्या अर्जावर तातडीने निर्णय घ्या : जळगाव जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

जळगाव : जिल्ह्यात पीककर्ज व कर्ज वितरण यासंबंधी जिल्हा प्रशासनाने नुकतीच बैठक घेतली. त्यात कर्ज मागणीसाठी जे प्रस्ताव आले असतील त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, विलंब केला तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी दिला. 

जळगाव : जिल्ह्यात पीककर्ज व कर्ज वितरण यासंबंधी जिल्हा प्रशासनाने नुकतीच बैठक घेतली. त्यात कर्ज मागणीसाठी जे प्रस्ताव आले असतील त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, विलंब केला तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी दिला. 

जिल्ह्यातील पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक, आत्तापर्यंत झालेले वितरण, शेतकऱ्यांचे अर्ज व बॅंकांकडे उपलब्ध निधी याची माहिती घेण्यात आली. बैठकीत अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. 

ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांनाही बॅंकांनी पीककर्ज वितरण करावे. एकही शेतकरी वंचित राहायला नको. जे अर्ज पीककर्ज मागणीसाठी बॅंकेकडे आले आहेत, ते तातडीने मंजूर करावेत. सर्व बॅंकांनी पीककर्ज वितरण लक्ष्यांक वेळेत पूर्ण करायला हवा. १५ दिवसांत पीककर्जासाठी आलेला अर्ज मार्गी लावला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्‍चित केली जाईल. कर्ज प्रकरण योग्य असले तर ते तातडीने मंजूर करून वित्तपुरवठा लागलीच व्हायला हवा.

कर्ज प्रकरण नामंजूर केले तर संबंधित शेतकऱ्याला १५ दिवसांमध्ये ते कळविले जावे. नियम लक्षात घेऊनच कर्ज वितरण करावे. जिल्हा बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे किती अर्ज आले आहेत, याची माहिती घेण्यात आली. तसेच मुद्रा योजनेबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. जे कर्जदार शेतकरी आहेत, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी करून घेतले जावे. तसेच बिगर कर्जदारांनाही यासंदर्भात माहिती देऊन या योजनेचा लाभ त्यांना द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर यांनी केले.

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...