agriculture news in marathi, take Hearing the objections of Pandharpur development plan | Agrowon

पंढरपूर विकास आराखड्यावरील हरकतींची सुनावणी घ्या
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सोलापूर : पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व सूचना, हरकतींची सुनावणी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री तथा पंढरपूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी येथे दिल्या.

सोलापूर : पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व सूचना, हरकतींची सुनावणी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री तथा पंढरपूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी येथे दिल्या.

पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तज्ज्ञ सदस्य नगररचनाचे निवृत्त उपसंचालक एस. व्ही. सुर्वे, निवृत्त नगररचनाकार शेखर चव्हाण, श्रीकांत जहागिरदार उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, "पंढरपूर विकास प्राधिकरण आराखड्यासंदर्भात मुदतीत ५८० आणि मुदतीनंतर ५५६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींची सुनावणी घेण्यात यावी.

प्राधिकरणामार्फत विकास योजना राबविताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी प्राधिकरणाच्या सदस्यांनी रस्त्यांची, जागेची पाहणी करून तसा अहवाल प्राधिकरणास सादर करावा.

आवश्‍यक असणाऱ्या रस्त्यांची कामे घेण्यास प्राधान्य द्यावे. सर्व गावातील रेडीरेकनर उपलब्ध करून घ्यावा. भूसंपादन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याबाबत आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या सूचनांचाही विचार करावा.''

हरकतींवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार
प्रशासनाकडे आलेल्या ५८० हरकतींची सुनावणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या कार्यालयात ३, ४, १० व ११  मार्चला घेण्यात येणार आहे.मुदतीनंतर प्राप्त झालेल्या ५५६ हरकतींची सुनावणी २३, २४ व २५ मार्चला उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. नाळे यांनी बैठकीत दिली.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...