agriculture news in marathi, Take precautions during insectiticide spraying, Mumbai | Agrowon

कीटकनाशकांच्या फवारणीवेळी खबरदारी घ्या : कृषी विभाग
मारुती कंदले
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

संरक्षक कीटचा वापर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, खबरदारी घेऊनही विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करून त्यासंदर्भात शासकीय यंत्रणेला कळविणे आवश्यक आहे.

मुंबई: यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांत कापूस व सोयाबीनवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा झाली. या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत कीटकनाशकांची फवारणी करताना खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच विषबाधा झालेल्या व्यक्तींची शासकीय यंत्रणेला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहनही कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी केले आहे.  

अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी कीटकनाशकांची अथवा कीडनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. संरक्षक कीटचा वापर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, खबरदारी घेऊनही विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करून त्यासंदर्भात शासकीय यंत्रणेला कळविणे आवश्यक आहे. तसेच कीटकनाशकांची फवारणी करताना सर्व शेतकरी व शेतमजूर यांनी हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी इत्यादीचा वापर करावा. 

कीटकनाशकांची फवारणी शेतमजुरांमार्फत केली जात असताना शेतमजुरांना संरक्षक कीट पुरवून, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याची जबाबदारी शे‍तमालकाची आहे. कीटकनाशकांची फवारणी करतेवेळी प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवावे. पिकावर कीटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये कीटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

फवारणी करताना वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करून फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्याचा फवारा मोठ्या प्रमाणात शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते. फवारणी करताना जवळपास अन्य असंबंधित व्यक्ती अथवा जनावरे असणार नाहीत याची काळजी घ्यावी.

ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरिन गटातील कीटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी.) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. फवारणी करताना कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहिती पत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच कीटकनाशकांचे पाण्यामध्ये मिश्रण तयार करताना कंपनीने दिलेल्या प्रमाणानुसारच मिश्रण तयार करावे.

शेतमालकाने माणुसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती कृषी सहायकाला अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला अथवा तहसीलदार यांना अथवा पोलिस ठाणे अंमलदारास अथवा आरोग्य अधिकाऱ्याला अथवा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याला अथवा जिल्हा शल्यचिकित्सकाला अथवा जिल्हाधिकारी यांना तातडीने माहिती कळवावी, असे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्‍यक
कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर, शिल्लक राहिलेले कीटकनाशक, कीटकनाशकाचे डबे, पॅकिंग, बॉक्स, इत्यादी साहित्य काळजीपूर्वक नष्ट करावे अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे. कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमालकाने अथवा शेतमजुरांनी फवारणी दरम्यान, अथवा फवारणी पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये.

शेतमालकाने कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुराची सरकारी दवाखान्यामार्फत वर्षातून किमान एकदा शारीरिक तपासणी करून घ्यावी. या मार्गदर्शक सूचनांचे पालन शेतकरी व शेतमजूर यांनी करणे आवश्यक आहे, जेणेकरून संभाव्य जीवितहानी टाळता येऊ शकेल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळवली...सांगली जिल्ह्यातील आरग येथील जयकुमार अण्णासो...
दूध पावडर बनली आंदोलनाची ठिणगीपुणे : राज्यातील दूध आंदोलनाला दूध पावडरची समस्या...
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागेनागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर...
होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...