agriculture news in marathi, Take Seed variety sanction committee meeting says Industry | Agrowon

वाण मान्यता समितीची बैठक घ्या : बियाणे उद्योग
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 मे 2018

पुणे : राज्यात बियाण्यांच्या नव्या वाणाच्या चाचण्या घेणे आणि मान्यता देण्याबाबत स्पष्ट नियमावली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. बियाणे वाण मान्यता समितीची बैठक घेण्याचा आग्रह राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे करण्यात आला आहे.  वाण मान्यता समितीने घेतलेल्या आधीच्या निर्णयावर कार्यवाही करण्याची मागणी सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सियाम’ने अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार यांच्याकडे केली आहे. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप यांच्याकडे सियामने काही मुद्दे मांडले आहेत. 

पुणे : राज्यात बियाण्यांच्या नव्या वाणाच्या चाचण्या घेणे आणि मान्यता देण्याबाबत स्पष्ट नियमावली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. बियाणे वाण मान्यता समितीची बैठक घेण्याचा आग्रह राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे करण्यात आला आहे.  वाण मान्यता समितीने घेतलेल्या आधीच्या निर्णयावर कार्यवाही करण्याची मागणी सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सियाम’ने अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार यांच्याकडे केली आहे. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप यांच्याकडे सियामने काही मुद्दे मांडले आहेत. 

 “वाण मान्यता समितीची बैठक गेल्या वर्षभरापासून घेण्यात आलेली नाही. नव्या वाणांना मान्यताही देण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्यापूर्वी राज्य शासनाला परिस्थिती समाजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असे सियामचे म्हणणे आहे. “संशोधित व संकरित बियाण्यांच्या नव्या वाणाला मान्यता देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला गेला आहे. ''मान्यतेच्या प्रक्रियेमध्ये काही बदल करून लवकरच मान्यता दिली जाईल,'' असे कंपन्यांना सांगितले जात होते.  मात्र, प्रत्यक्षात वाण मान्यता समितीच्या ६ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही, अशी तक्रार सियामने श्री.बिजय कुमार यांच्याकडे केली आहे. 

मान्यता समितीच्या इतिवृत्ताचा आधार घेत कंपन्यांनी आपल्या बिजोत्पादनाला सुरुवात केली. तसेच उपलब्ध बियाण्यांची विक्री यंदाच्या खरिपात करण्यासाठी कंपन्यांनी नियोजनदेखील केले आहे. मात्र, मान्यता नसल्यामुळे कंपन्या आणि शेतकर्ऱ्यांची हानी होणार आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. वाण मान्यता समितीची शिफारस असलेल्या वाणांना त्वरित बियाणे परवाने देण्यात यावेत अन्यथा जुन्या नियमावलीनुसार निर्णय घेण्याचा पर्याय निवडावा, असेही सियामने म्हटले आहे. 

राज्याचे कृषी विस्तार संचालक विजय घावटे यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात सियामने शेतक-यांसाठी नवे बियाणे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया २०१५ सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. चाचण्या होऊन तीन वर्षांनंतर तरी नवे बियाणे शेतक-यांच्या हाती पडणे अपेक्षित आहे. मात्र, तसे राज्यात होत नसून, विद्यापीठ स्तरावरील बियाण्यांच्या चाचण्या व मान्यता मिळण्याची ''दर्जेदार संनियत्रणाची कार्यपद्धती'' (एसओपी) तयार करावी," अशी मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, राज्यातील १४ बियाणे उत्पादक कंपन्यांनी ८४ वाणांच्या चाचण्यांसाठी अर्ज केलेले आहेत. चाचण्या होऊन मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या वाणांसाठी मान्यता समितीची बैठक लवकरच घेतली जाईल. नियमांचे पालन करणा-या कंपन्यांच्या वाणांना मान्यता देण्याबाबत कोणतीही आडकाठी आणली जात नाही, असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...